Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये नाही; कोर्टाकडून दिलासा!

| Updated on: Oct 07, 2020 | 6:31 PM

रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना अनेक मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आले आहे. यामध्ये रिया ड्रग्ज डीलर चेनचा (Drug Syndicate) हिस्सा नसल्याचे म्हटले गेले आहे.

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती ड्रग्ज सिंडिकेटमध्ये नाही; कोर्टाकडून दिलासा!
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात (Drugs Syndicate) अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला अखेर जामीन मिळाला आहे. तीन वेळा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टाने अखेर आज (7 ऑक्टोबर) तिला जामीन मंजूर केला आहे.  रिया ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये नसल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. तब्बल एक महिना रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) जेलमध्ये होती. बुधवारी रियासोबत आणखी दोन जणांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, रियाचा भाऊ शौविक याचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळून लावला आहे (Rhea Chakraborty is not involve in the Drugs Syndicate says Mumbai HC).

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीसह सुमारे 21 जणांना अटक झाली होती. ज्यांना तपासाच्या सुरुवातीला अटक झाली होती आणि जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यापैकी पाच जणांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी 23 सप्टेंबर रोजी अर्ज केला होता. त्यावर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता, ज्यावर आज निर्णय देण्यात आला आहे.

रिया चक्रवर्तीसह, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत आणि आबीद बसित परिहार या चार जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, यापैकी केवळ रिया, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत या तिघांनाच जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने अनेक अटीदेखील घातल्या आहेत. तर, शौविक चक्रवर्ती आणि आबीद बसित परिहार यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला गेला आहे. (Rhea Chakraborty is not involve in the Drugs Syndicate says Mumbai HC)

मुंबई हायकोर्टाचे रियाच्या निकालात महत्त्वाचे निरीक्षण

रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना अनेक मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आले आहे. यामध्ये रिया ड्रग्ज डीलर चेनचा (Drug Syndicate) हिस्सा नसल्याचे म्हटले गेले आहे. रियाला सर्वात प्रथम कोर्टासमोर हजर करण्यात आले तेव्हा NCB ने तिचा ताबा मागितला नव्हता. याचाच अर्थ NCBतिच्या चौकशीबाबत समाधानी होती. तिने एनसीबीला चौकशी दरम्यान सहकार्य केले होते.

सुशांत सिंह राजपूत हा स्वत:च्या घरात राहत होता आणि स्वत:च्या गरजांसाठी खर्च करत होता. त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) त्याला आश्रय दिला आणि अमली पदार्थ मिळवण्यासाठी पैशांचा पुरवठा केल्याचे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

रियाची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही. तसेच, अमलीपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीतही ती सहभागी असल्याचे दिसत नाही. रिया ड्रग्ज सिंडिकेटची (Drug Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने रियाला जामीन देण्यात आला आहे. NCB ने ज्या कलमांतर्गत रियावर कारवाई केली, ती कलम कोर्टात सिद्ध केली गेली नाहीत, असेही कोर्टाने म्हटले आहे.

दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम २७-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्या सारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले.

(Rhea Chakraborty is not involve in the Drugs Syndicate says Mumbai HC)

संबंधित बातम्या : 

Rhea Chakraborty bail | तब्बल 28 दिवसानंतर रियाची सुटका, भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त!