Pune RTO : अडीच महिन्यानंतर पुण्यातील आरटीओ कार्यालय सुरु

| Updated on: Jun 19, 2020 | 9:10 AM

पुण्यात लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज आजपासून (19 जून) सुरू होत (RTO Office Pune) आहे.

Pune RTO : अडीच महिन्यानंतर पुण्यातील आरटीओ कार्यालय सुरु
Follow us on

पुणे : पुण्यात लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज आजपासून (19 जून) सुरू होत (RTO Office Pune) आहे. पण कार्यालयामध्ये आता प्रत्येक कामासाठी अपॉईमेंट घ्यावी लागणार आहे. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला (RTO Office Pune) आहे.

परिवहन कार्यालयातील परवाना कोटाही जवळपास 80 ते 85 टक्के कमी करण्यात आला आहे. त्यासोबत परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील परवाना, योग्यता प्रमाणपत्र, हस्तांतरण यांसह विविध नियमित कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी पुणे कार्यालयाने सर्वच कामांसाठी अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक ठेवले आहे. अपॉइंटमेंट शिवाय कोणतेही कामं होणार नाहीत. त्यानुसार आयडीटीआर, भोसरी, आळंदी रस्ता, दिवे आणि मुख्य कार्यालयांसाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन आता हळूहळू शीथील करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी कार्यलय त्यासोबत काही खासगी कार्यालयेही सुरु झाले आहेत. त्यासोबत छोटे-मोठे उद्योग, व्यवसायही तसेच दुकानं आणि सार्वजनिक वाहतूकही सुरु करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातही सौम्य लक्षणे असणार्‍या कोरोनाग्रस्तांवर घरीच उपचार, महापालिकेचा निर्णय

Corona Update | राज्यात दिवसभरात 3,752 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 20 हजार 504 वर