बलुगा व्हेलचा रशियाकडून हेरगिरीसाठी उपयोग?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

औस्लो (नॉर्वे) : अत्यंत दुर्मिळ अशा सफेद रंगाचा बलुगा व्हेल (Beluga whale) मासा नॉर्वे देशाच्या समुद्रात आढळला आहे. या मासाच्या गळ्याभोवती पट्टी गुंडाळली असून त्यात कॅमेरा अडकवला आहे. यावरुन रशियाकडून या व्हेल माशाचा उपयोग हेरगिरी करण्यासाठी होत असल्याचा दाट संशय सध्या जगभरात व्यक्त होत आहे. नॉर्वेची सीमा रशियाला लागूनच आहे. नॉर्वेतील काही मच्छीमार मच्छिमारी करत […]

बलुगा व्हेलचा रशियाकडून हेरगिरीसाठी उपयोग?
Follow us on

औस्लो (नॉर्वे) : अत्यंत दुर्मिळ अशा सफेद रंगाचा बलुगा व्हेल (Beluga whale) मासा नॉर्वे देशाच्या समुद्रात आढळला आहे. या मासाच्या गळ्याभोवती पट्टी गुंडाळली असून त्यात कॅमेरा अडकवला आहे. यावरुन रशियाकडून या व्हेल माशाचा उपयोग हेरगिरी करण्यासाठी होत असल्याचा दाट संशय सध्या जगभरात व्यक्त होत आहे. नॉर्वेची सीमा रशियाला लागूनच आहे.

नॉर्वेतील काही मच्छीमार मच्छिमारी करत असताना, त्यांना बोटीमागे एक व्हेल मासा येत असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी बोट थांबवत त्या माशाचे निरीक्षण केले. त्यावेळी त्या मच्छिमारांना तो मासा बेलुगा व्हेल जातीचा असल्याचे जाणवले. त्याशिवाय या माशाच्या गळ्यात एका पट्ट्यासारखे काहीतरी गुंडाळले असल्याचे मच्छिमारांच्या लक्षात आले. या मासाच्या गळ्यात गुंडाळलेल्या पट्ट्यावर कॅमेरा लावण्यात आला होता. विशेष म्हणजे यात इक्युपेमंट ऑफ सेंट पीट्सबर्ग असे लिहिले होते. यामुळे या माशाचा उपयोग रशियाकडून हेरगिरी करण्यात येत असावा अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

रशियाकडे अनेक प्रशिक्षित केलेले घरगुती व्हेल मासे आहेत हे सर्वांनाच माहित आहे. या व्हेलपैकी काही मासे त्यांनी समुद्रात सोडले असल्याची शक्यता आहे. असे आर्कटिक विद्यापीठात मरीन बायॉलॉजीचे प्रोफेसर आडन रिकॉर्ड्सन यांनी म्हटले आहे.

दरम्यान याआधीही शीतयुद्धादरम्यान रशियाने सबमरीन आणि फ्लॅगमाइन्ससाठी डॉल्फिन माशाचा वापर करत हेरगिरी केली होती. त्यासोबतच जहाजांच्या सरंक्षणासाठी समुद्री जीवांचा वापर करण्यात आला आहे. तसेच रशियाने समुद्री जीवांच्या मदतीने अनेकदा हेरगिरी करत युद्धात विजय मिळवला आहे. यानंतर 1960 मध्ये अमेरिकी नौसेनेनं बेलागस, डॉल्फिन आणि इतर समुद्री जीवांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम सुरु केले होते.

बेलुगा व्हेल माशाबद्दल थोडक्यात माहिती 

बेलुगा व्हेल माशाला बोली भाषेत पांढरा व्हेल म्हणतात. हा व्हेल प्रजातीतील सर्वात छोटा व्हेल आहे. बेलुगा व्हेलचा आकार २० फुटांपर्यंत असतो. हा व्हेल सर्वसाधारणपणे आर्क्टिक महासागरात आढळतो.