मोदी सरकारमुळे मजुरांची उपेक्षा, भाजप नेत्यांनी खोटं बोलणं सोडावं : सचिन सावंत

भाजप नेत्यांनी रेल्वेच्या भाड्याबाबत मांडलेली भूमिका खोटी होती. आता भाजप नेत्यांनी खोटं बोलण सोडावं, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे (Sachin Sawant on Modi government and corona crisis).

मोदी सरकारमुळे मजुरांची उपेक्षा, भाजप नेत्यांनी खोटं बोलणं सोडावं : सचिन सावंत
| Updated on: May 30, 2020 | 4:42 PM

मुंबई : भाजप नेत्यांनी रेल्वेच्या भाड्याबाबत मांडलेली भूमिका खोटी होती. केंद्र सरकारनं कोर्टात भाडं राज्यानं दिल्याचं स्पष्ट केलं आहे. आता भाजप नेत्यांनी खोटं बोलण सोडावं, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे (Sachin Sawant on Modi government and corona crisis). यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारमुळेच मजुरांची उपेक्षा झाल्याचाही आरोप केला.

सचिन सावंत म्हणाले, “भाजप नेत्यांनी रेल्वेच्या भाड्याबाबत मांडलेली भूमिका खोटी होती. केंद्र सरकारनं कोर्टात भाडं राज्यानं दिल्याचं स्पष्ट केलं आहे. आता भाजप नेते ते अनुदान असल्याचं म्हणत आहेत. मात्र, यावरुन रेल्वेचं राजकारण केलं जात असल्याचं स्पष्ट होत आहे. केंद्राच्या अपयशामुळंच मजुरांची उपेक्षा झाली. याबाबत भाजप नेत्यांनी आता खोटं बोलणं सोडावं.”

मोदी सरकारला सहा वर्षे झाले. आज देश कोरोनाच्या संकटात लोटला गेला त्याला फक्त मोदी सरकार कारणीभूत आहे. हेच मोदी सरकारचं मोठं अपयश आहे. मोदी त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात गुंग आहेत. पण देश संकटाच्या दरीत लोटला गेलाय. जीडीपी फक्त आताच कमी होईल असं नाही. याआधीही जीडीपीचे दर कायम खाली जात होते. कोरोनाचं संकट आता आलं, पण मोदी सरकारच्या काळात आधीपासून जीडीपीचा हा दर कमी होत गेला. जीडीपीनं गेल्या दशकातील निचांक गाठला होता. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची धोरणं जबाबदार आहेत, असंही सचिन सावंत म्हणाले.

लॉकडाऊन हा कोरोना नियंत्रणावरील अंतिम उपाय नाही. लॉकडाऊनचा उपयोग हा कोरोना चाचण्या वाढवण्यासाठी आणि आरोग्यविषयक सोयी सुविधा वाढवण्यासाठी करायला हवा होता. पण केंद्र सरकारने तसं केलं नाही. त्यामुळं अर्थचक्रही रुतून बसलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

मुंबईत 24 तासात 192 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती, सुदैवाने 196 बाळ निगेटिव्ह

वरळी पॅटर्न वगैरे काही नाही, सरकारने बनवाबनवी थांबवावी : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची कुलगुरुंसोबत बैठक, अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निर्णयाकडे लक्ष

व्हिडीओ पाहा :


Sachin Sawant on Modi government and corona crisis