धुळ्यात काँग्रेस आमदाराच्या गाडीची धडक, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

साक्री (धुळे) : साक्री विधानसभा मतदारसंघाती काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे यांच्या वाहनाने दोघांजा जीव घेतला आहे. आमदारांच्या वाहनचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत दोन सख्ख्या भावांना धडक दिली आणि या धडकेत दोन्ही सख्खे भाऊ जागीच मृत्यूमुखी पडले. आमदार डी. एस. अहिरे यांचा वाहनचालक दारु पिऊन वाहन चालवत होता, असा गंभीर आरोप मृत्युमुखी पडलेल्या दोन भावांच्या नातेवाईकांनी […]

धुळ्यात काँग्रेस आमदाराच्या गाडीची धडक, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Follow us on

साक्री (धुळे) : साक्री विधानसभा मतदारसंघाती काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे यांच्या वाहनाने दोघांजा जीव घेतला आहे. आमदारांच्या वाहनचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत दोन सख्ख्या भावांना धडक दिली आणि या धडकेत दोन्ही सख्खे भाऊ जागीच मृत्यूमुखी पडले. आमदार डी. एस. अहिरे यांचा वाहनचालक दारु पिऊन वाहन चालवत होता, असा गंभीर आरोप मृत्युमुखी पडलेल्या दोन भावांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मालांजन येथील सोनवणे कुटुंबातील दोन सख्खे भाऊ  लग्न लावून परत येत असताना ते धाडणे फाट्याजवळ आले आणि त्यांना आमदार अहिरे यांच्या वाहनाने त्यांच्या साक्षीने धडक दिली. या धडकेने दोन सख्ख्या भावांचा बळी घेतला. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी पुढे पाठवायची तसदी न घेता स्वतः आमदार आणि त्यांच्या चालकाने तेथून पळ काढला. अपघातातील जखमींना वाऱ्यावर सोडले आणि नंतर दुदैवाने त्यांचा मृत्य ओढवला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे

त्यानंतर जेव्हा आमदार डी. एस. अहिरे यांच्या गाडीच्या पाहणीत अत्यंत धक्कादायक चित्र समोर आलं. त्या गाडीत दारुच्या भरलेली बाटल्या आढळल्याने प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलीस प्रशासनाची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात आली.

थोड्याच वेळात पोलिसांनी अपघातग्रस्त कार तात्काळ उचलण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांनी हाणून पाडला. दोन जीव गेले तरी प्रशासन मात्र आमदारांना वाचवण्यात धन्यता मानत होते अस चित्र तिथ दिसत होते. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस आणि क्रेनला तिथून माघारी धाडलं.

दरम्यान, रात्री मृतदेह शवविच्छेदनासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठविले असून, ग्रामस्थांनी सुरत-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केला.