AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 हजार शेतकऱ्यांची पत्रे, समरजितसिंह घाटगे राज्यपालांच्या भेटीला

समरजितसिंह घाटगे सरसकट कर्जमाफीच्या मागणीची 50 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार.

50 हजार शेतकऱ्यांची पत्रे, समरजितसिंह घाटगे राज्यपालांच्या भेटीला
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 25, 2020 | 8:17 AM
Share

कोल्हापूर : भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarajitsingh Ghatge Meet Governor) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान सरसकट कर्जमाफीच्या मागणीची 50 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सरकारने कर्जमाफी योजनेमध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्य़ा शेतकऱ्यांवर अन्याय केला (Samarajitsingh Ghatge Meet Governor) आहे. राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. या योजनेतील चुकीच्या निकषांमुळे कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील बहुतांशी शेतकर्‍यांना झालाच नाही. जिल्ह्यातील शेतकरी स्वाभिमानी आहेत. घेतलेली कर्जे वेळेत भरली जातात, मात्र कर्ज वेळेवर भरणे हा त्यांचा दोष आहे? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. म्हणून अन्याय झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना थेट राज्यपालांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे.

नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांवर झालेला अन्याय आणि सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकर्‍यांच्याच पत्राद्वारे थेट राज्यपालांकडे पोहोचवण्याचा निश्चय समरजितसिंह घाटगे यांनी केला होता. त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची पत्र जमा करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दहा दिवसात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांचाही या मोहिमेला प्रतिसाद मिळाला. तब्बल 50 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या हाताने लिहिलेली पत्र राज्यपालांकडे पाठवण्यासाठी दिली. यातील तीन शेतकऱ्यांनी चक्क रक्ताने पत्र लिहिली.

समरजितसिंह घाटगे या शेतकऱ्यांची पत्र घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत (Samarajitsingh Ghatge Meet Governor). मुंबईत राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांची पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...