साताऱ्यात खवले मांजराची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Aug 30, 2020 | 10:53 PM

सातारा जिल्ह्यात वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाच्या भरारी पथकास मिळाली होती.

साताऱ्यात खवले मांजराची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त
Follow us on

सातारा : सातारा वनविभागाने खवले मांजराची तस्करी करणाऱ्या 4 जणांच्या (Satara Pangolin Smuggling) मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी 1 खवले मांजर, 3 दुचाकी, 6 मोबाईल असा एकूण 1 लाख 10 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे (Satara Pangolin Smuggling).

सातारा जिल्ह्यात वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाच्या भरारी पथकास मिळाली होती. त्यानुसार, वनविभागाचे वेळे येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेल शिव कैलासच्या समोर शनिवारी (29 ऑगस्ट) दुपारी सापळा रचून खवले मांजर विक्री करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक खवले मांजर, तीन दुचाकी, 6 मोबाईल असा 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये सातारचे दोघे आणि पुण्यातील दोघांचा समावेश आहे.

वनविभागाच्या भरारी पथकास सातारा जिल्ह्यात खवले मांजराची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी वनविभागाच्या पथकाने पोलिसांप्रमाणे पद्धत वापरत ग्राहक बनत त्यांना शिताफीने अटक केली.

आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara Pangolin Smuggling

संबंधित बातम्या :

झाडांच्या नावाखाली गांजाची तस्करी, जळगावात 38 लाखांचे अमली पदार्थ जप्त

चना डाळच्या पोत्यांखालून गुटख्याची तस्करी, तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारीचे 52 पोते जप्त