Scholarship Exam 2022 : पोरांनो जागे व्हा ‘शिष्यवृत्ती आली’ ! 5वी आणि 8वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेला अर्ज भरू शकता

या परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 एप्रिल या तारखा दिलेल्या आहेत. या आधी हे अर्ज भरण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला होता परंतु काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता ही संधी देण्यात आलीये.

Scholarship Exam 2022 : पोरांनो जागे व्हा शिष्यवृत्ती आली ! 5वी आणि 8वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर, या तारखेला अर्ज भरू शकता
शिष्यवृत्ती आली !
Image Credit source: TV9 marathi
| Updated on: Apr 22, 2022 | 4:35 PM

मुंबई : अखेर राज्य शिक्षण परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची (Examination) तारीख जाहीर (Announce) करण्यात आलीये. शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship Exam) ही राज्यभरात एकाच दिवशी घेतली जाणार आहे. 20 जुलैला इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. टीईटी परीक्षेचा घोटाळा आणि कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर पडली होती. या परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 एप्रिल या तारखा दिलेल्या आहेत. या आधी हे अर्ज भरण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला होता परंतु काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता ही संधी देण्यात आलीये.

महत्त्वाचे

राज्य शिक्षण परिषदेमार्फत घेतली जाते शिष्यवृत्ती परीक्षा

राज्यभरात एकाच दिवशी होणार शिष्यवृत्ती परीक्षा

येत्या 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार

विद्यार्थी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार MHT CET

कोरोना महामारीचा सगळ्यात जास्त परिणाम जर कशावर झाला असेल तर तो शिक्षणक्षेत्रावर झालाय. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरु झालेत. परीक्षांच्या तारखा, निकालाच्या तारखा सतत पुढे मागे होतायत. एम एच सीईटी ची परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी या बाबत ट्विट करून माहिती दिली. जेईई मेन्स आणि नीट युजी च्या परीक्षांच्या तयारीमध्ये इतर परीक्षांचा गोंधळ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा देखील सांगण्यात आलं.

इतर बातम्या :

Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, जाणून घ्या कशी असेल लोकल सेवा

Encounter in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे चकमकीत चार दहशतवादी ठार

Udgir Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन, साहित्य नगरीत उत्साह