Udgir Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन, साहित्य नगरीत उत्साह

उदगीर : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Udgir Sahitya Sammelan) उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. उदगीर येथईल उदयगिरी महाविद्यालयातील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे (Bharat Sasne), माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री […]

Udgir Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन, साहित्य नगरीत उत्साह
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 4:20 PM

उदगीर : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Udgir Sahitya Sammelan) उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. उदगीर येथईल उदयगिरी महाविद्यालयातील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे (Bharat Sasne), माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री तथा स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, कौतिकराव ठाले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

विशिष्ट विचारधारा लोकशाहीसाठी धोक्याची घंटा- शरद पवार

संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्यावर आपली मतं व्यक्त केली. ते म्हणाले, आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. प्रोपागंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. हिटलरने ‘माईन काम्फ’ पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रोपागंडा ( मतप्रचार ) हे त्याचे भयानक उदाहरण आहे. आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावताना दिसतो आहे. साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे. साहित्य हे मुक्त असावे असे मी म्हटलो. याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला ते बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

महिला साहित्यिकांचा तोटा काय?

साहित्य संमेलनातील अध्यक्ष पदाच्या निवडीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ‘ साहित्य आणि राजकारण यांचे अतूट नाते असल्याने साहित्यविश्वात देखील राजकारणाचा शिरकाव झाला आहे. विशेषतः संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड निवडणूक पद्धतीने सुरू झाल्यानंतर साहित्यिकांच्या अंतरंगात आमच्यातील राजकारणी घुसू लागला आहे. त्याचा अत्याधिक तोटा महिला साहित्यिकांना संभवतो. आजपर्यंतच्या साहित्य संमेलनांचा आढावा घेतला असता दिसून येते की, पहिले साहित्य संमेलन इ.स. 1878 मध्ये भरले तरी महिलेला अध्यक्षपदाचा मान मिळण्यासाठी 1961 साल उजाडावे लागले. श्रीमती कुसुमावती देशपांडे या विदुषीला तो पहिल्यांदा मान मिळाला. त्यानंतर श्रीमती दुर्गा भागवत, कवयित्री शांता शेळके, डॉ. विजया राजाध्यक्ष अशा थोडक्या महिलांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषवता आले. चक्रधरस्वामींच्या महानुभाव पंथातील आद्य कवयित्री महदंबा ते जनाबाई, मुक्ताबाई तसेच सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक ते अरुणा ढेरे-संजिवनी तडेगावकरांपर्यंत असंख्य महिलांनी मराठी साहित्यात आपला अवीट ठसा उमटवला आहे, असेही पवार यांनी सांगितले.

इतर बातम्या-

Maharashtra scholarship exam 2022 : शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त! राज्यभरात एकाच दिवशी होणार परीक्षा; वाचा सविस्तर

MP Navneet Rana : बाळासाहेबांबरोबर शिवसेनेची विचारधाराही गेली, नवनीत राणा यांची खोचक टीका

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.