Maharashtra scholarship exam 2022 : शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त! राज्यभरात एकाच दिवशी होणार परीक्षा; वाचा सविस्तर

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची (Scholarship exam) तारीख अखेर जाहीर झाली आहे. राज्यभरात एकाच दिवशी ही शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. येत्या 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हांमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेतली जाणार आहे.

Maharashtra scholarship exam 2022 : शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त! राज्यभरात एकाच दिवशी होणार परीक्षा; वाचा सविस्तर
UGC NET 2022Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 3:55 PM

पुणे : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची (Scholarship exam) तारीख अखेर जाहीर झाली आहे. राज्यभरात एकाच दिवशी ही शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. येत्या 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हांमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Council Of Examination) ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. टीईटी परीक्षेतील घोटाळा आणि कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर पडली होती. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने अर्ज भरणयासाठी आवश्यक कालावधी दिला होता. परंतु काही कारणास्तव ऑनलाइन (Online) अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेतली जाते. यंदाही ती नियोजित वेळेतच होणार होती. मात्र सध्या शाळा बंद आहेत. अर्ज भरण्यासही अनेक अडचणी लक्षात घेता मुदतवाढ देण्यात आली.

जबाबदारी कोणाकडे?

यंदा होणाऱ्या परीक्षेची जबाबदारी विनर कंपनीकडे दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा तसेच नुकताच उघडकीस आलेला टीईटी घोटाळा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

संकेतस्थळावर सविस्तर माहिती

राज्यभरातून यापर्षी इयत्ता पाचवीचे 4 लाख 10 हजार 395 तर आठवीचे 2 लाख 99 हजार 255 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. फेब्रुवारीत होणारी परीक्षा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर होणार आहे. तसेच याबाबतची माहिती संकेतस्थळावर सविस्तरपणे परीक्षा परिषदेने दिली आहे.

आणखी वाचा :

Pune BJUM vs Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा…; भाजयुमोची पुण्याच्या संभाजी पोलिसांत तक्रार

Pune Ajit Pawar : छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचा विचार सुरू; कोळसा टंचाईवर अजित पवार यांची पुण्यात माहिती

Deccan queen : डेक्कन क्वीनचा आणखी एका रुपात! नव्या डायनिंग कोचसह प्रवाशांच्या सेवेत मेपासून धावणार..!

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.