Deccan queen : डेक्कन क्वीन आणखी एका रुपात! नव्या डायनिंग कोचसह प्रवाशांच्या सेवेत मेपासून धावणार..!

Deccan queen : डेक्कन क्वीन आणखी एका रुपात! नव्या डायनिंग कोचसह प्रवाशांच्या सेवेत मेपासून धावणार..!
डेक्कन क्वीन (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: Indiainfrahub

प्रवाशांची आवडती रेल्वेगाडी डेक्कन क्वीन (Deccan queen) नव्या कोऱ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. मुंबई-पुणेदरम्यान रोज धावणाऱ्या डेक्कन क्वीनमध्ये नवीन डायनिंग कोच असणार आहे. चेन्नईहून इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजेच आयसीएफमधून (ICF) मुंबईत दाखल आहे.

प्रदीप गरड

|

Apr 23, 2022 | 9:38 AM

पुणे/मुंबई : प्रवाशांची आवडती रेल्वेगाडी डेक्कन क्वीन (Deccan queen) नव्या कोऱ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. मुंबई-पुणेदरम्यान रोज धावणाऱ्या डेक्कन क्वीनमध्ये नवीन डायनिंग कोच असणार आहे. चेन्नईहून इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजेच आयसीएफमधून (ICF) मुंबईत दाखल आहे. त्यामुळे आता डायनिंग कोचसह लवकरच नवी कोरी डेक्कन क्वीन पाहायला मिळणार आहे. मेमध्ये हे नवे रुपडे आपल्याला दिसणार आहे. जून 1930पासून डेक्कन क्वीनला डायनिंग कोच आहे. दोन वर्षांपूर्वी गाडीला अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) (LHB) डबे लावण्यात येणार होते. मात्र डायनिंग कोचमुळे ते जोडण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता एलएचबी बनावटीची डायनिंग कार तयार करण्यात आली आहे. डेक्कन क्वीनला भारतीय रेल्वेमधील एलएचबी डायनिंग कार असलेल्या पहिल्या ट्रेनचा मान मिळणार आहे.

दीड महिन्यांपूर्वीच मुंबईत दाखल झाले डबे

चेन्नईहून डेक्कन क्वीनचे 16 डबे दीड महिन्यांपूर्वीच मुंबईत दाखल झाले आहेत. तर डायनिंग कोचही मुंबईत आले आहेत. मे महिन्यात डेक्कन क्वीन चालविण्याची योजना असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अपघातरोधक डायनिंग कार

नवीन डायनिंग कार अपघातरोधक आहे. डायनिंग कोचमध्ये 10 टेबल असून 40 प्रवासी बसू शकतील. प्रवाशांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ येथे मिळणार आहेत, अशी माहितीही मध्ये रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

आणखी वाचा :

Pune crime : शिवीगाळ केली म्हणून काचेनं गळा चिरून निर्घृण खून; पुण्याच्या नऱ्हेतल्या व्यसनमुक्ती केंद्रातला धक्कादायक प्रकार

Pune Ajit Pawar : छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचा विचार सुरू; कोळसा टंचाईवर अजित पवार यांची पुण्यात माहिती

PCMC Voter list : तुमचं नाव मतदारयादीत आहे का? पिंपरी चिंचवडचे रहिवासी असाल तर महापालिकेतर्फे सुरू झालंय मतदारयादीचं काम!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें