AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Voter list : तुमचं नाव मतदारयादीत आहे का? पिंपरी चिंचवडचे रहिवासी असाल तर महापालिकेतर्फे सुरू झालंय मतदारयादीचं काम!

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणुका कधी होणार, याबाबत संभ्रम कायम असला तरी कधीही निवडणुका लागू शकतात. त्यासाठी महापालिका निवडणूक विभागातर्फे प्रभागनिहाय मतदारयादी (Voter list) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

PCMC Voter list : तुमचं नाव मतदारयादीत आहे का? पिंपरी चिंचवडचे रहिवासी असाल तर महापालिकेतर्फे सुरू झालंय मतदारयादीचं काम!
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक विभागाने हाती घेतले मतदारयादी तयार करण्याचे कामImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 4:08 PM
Share

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणुका कधी होणार, याबाबत संभ्रम कायम असला तरी कधीही निवडणुका लागू शकतात. त्यासाठी महापालिका निवडणूक विभागातर्फे प्रभागनिहाय मतदारयादी (Voter list) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात एकूण 14 लाख 41 हजार 55 मतदार आहेत. त्यात पुरूष मतदार 7 लाख 74 हजार 338, महिला मतदार 6 लाख 66 हजार 647 आणि तृतीयपंथीय 70 मतदार आहेत. सर्वाधिक 5 लाख 64 हजार 994 मतदार चिंचवड विधानसभेत आहेत. तर स्थलांतरित, दुबार, मृत, बोगस अशा 5 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा यावर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारीत प्रसिद्ध झाला. जाहीर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार आता प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) महापालिकेस दिले आहेत.

संगणकाद्वारे होणार याद्या बनवण्याचे काम

महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या आराखड्यामध्ये असलेल्या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना व राजकीय पक्षांना मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार ते आपल्या हरकती महानगरपालिकेच्या कार्यालयात जमा करू शकतात. प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर हद्दीतील बदलानुसार मतदार यादीच्या विभाजनामध्ये योग्य त्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. याद्या बनविण्याचे काम संगणकाद्वारे केले जाणार आहे.

आणखी वाचा :

राजकीय हेतूनं कृष्ण प्रकाश यांची बदली; पिंपरी चिंचवडच्या रिपब्लिकन युवा मोर्चानं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवला मेल

Pune crime : सोनं अन् मोबाइल लुटणारे 24 तासांत गजाआड; लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ शस्त्रांचा धाक दाखवून करत होते चोरी

Grips Festival : आला रे आला…! दोन वर्षांच्या सुट्टीनंतर मुलांसाठी पुण्यात ग्रिप्स थिएटर फेस्टिव्हल! काय खास? वाचा…

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.