वोटिंग कार्डवरील घराचा पत्ता बदलायचा आहे? करू नका चिंता, अशाप्रकारे अपडेट करता येईल तुमचे वोटिंग आयडी कार्ड!!

जर आपले मतदान क्षेत्र बदलले तर अशावेळी आपल्याला काही नियमाचे पालन करावे लागते. एकाच निवडणूक क्षेत्रातील आपला विभाग/ वार्ड जर बदलला तर अशावेळी आपल्याला या नियमांची अंमलबजावणी करून आपले मतदान कार्ड( (voter ID)) वरील पत्ता मध्ये जर बदल करायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल तर अशा वेळी काही कागदपत्रांची आवश्यकता असते त्या कागदपत्रांमध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट अवश्य लागते तसेच फॉर्म नंबर 6 भरावा लागतो असे केल्याने तुमचे वोटर आयडी अपडेट केले जाते.

वोटिंग कार्डवरील घराचा पत्ता बदलायचा आहे? करू नका चिंता, अशाप्रकारे अपडेट करता येईल तुमचे वोटिंग आयडी कार्ड!!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 2:06 PM

मुंबई : देशात येणाऱ्या काळामध्ये पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका व्यवस्थित पार पडाव्या म्हणून निवडणूक आयोग संपूर्ण तयारीमध्ये लागलेले आहेत. जर तुम्ही या निवडणूक होत असलेल्या राज्यात जर राहत असाल तर अशावेळी तुम्ही निवडणूक असलेल्या राज्यात राहून सुद्धा जर तुमच्या घराचा पत्ता जर बदललेला असेल तर तो पत्ता बदलून घेणे गरजेचे आहे. वोटर आयडीवरील पत्ता जरूर अपडेट करून घ्या.जर तुम्ही या वोटर आयडीला अपडेट केले नाही तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. जर तुमचा पत्ता व राहण्याचे ठिकाण जर बदललेले असेल तर अशावेळी वोटर लिस्ट (voter list) आपल्याला अपडेट करावी लागते आणि अपडेट केलेल्या लिस्टच्या आधारावरच तुम्हाला अपडेटेड वोटर आयडी (voter ID) बनवता येते आणि हे बदल तुम्ही ऑनलाईन (online voter ID card) सुद्धा करू शकतात.

सध्याच्या काळामध्ये आधार कार्ड (aadhar card) हे एकमेव व सशक्त असे कागदपत्र आहे. या कागदपत्राच्या आधारे आपण वोटर आयडी सुद्धा सहजरीत्या प्राप्त करू शकतो. आधार कार्डाच्या आधारावर तुम्हाला वोटिंग कार्ड सहजरित्या मिळते आणि ते काढायला सगळीकडे मान्यता सुद्धा प्राप्त होते. हे कार्ड तुम्ही अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून वापरू शकता परंतु जेव्हा गोष्ट मतदानाची वेळ येते, तेव्हा अशा वेळी जर तुमचे मतदानाचे क्षेत्र बदलले असेल, वॉर्ड जर बदलला असेल तर अशा वेळी योग्य त्या वॉर्डमध्ये जाऊन तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या वोटिंग कार्डावरील पत्त्यामध्ये बदल असणे सुद्धा आवश्यक आहे अशा वेळेस तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊन मतदान करू शकता. जर तुमच्या घराचा पत्ता बदलला आहे आणि तुम्हाला मतदान करायचं असेल तर आधी तुम्हाला वोटर आयडी कार्ड वरील पत्ता अपडेट करावा लागेल आणि हे काम तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता.

ही आहे प्रक्रिया

खरेतर वोटर आयडी वर आपल्या घराचा पत्ता लिहिलेला असतो त्यामध्ये वॉर्ड संख्या लीहलेली असते, ज्याचे तुम्ही मतदार असतात .जसे की तुमचा वार्ड बदलतो तेव्हा तुमचा पत्ता सुद्धा बदलून जातो अशावेळी आपल्याला वोटर आयडी मध्ये पत्ता बदल करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण दुसर्‍या ठिकाणी राहायला जातो अशा वेळी त्या ठिकाणाचा पत्ता आणि त्या ठिकाणाचा असलेल्या वार्ड नंबर आपल्याला आपल्या वोटर आयडी मध्ये समाविष्ट करणे गरजेचे होऊन बसते. जर तुम्ही त्या जागेवर नवीन असाल तर अशावेळी तुम्हाला पत्ता अपडेट करायचा असेल तर त्यासोबत मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा लागते यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://voterportal.eci.gov.in वेबसाईटवर जाऊन स्वतःला रजिस्ट्रेशन करावे लागते. एकदा रजिस्ट्रेशन केल्या नंतर आवश्यक ती माहिती तुम्ही या वेबसाईटवर जाऊन नमूद करू शकतात.

असा करा पत्ता अपडेट

1) आपल्या वोटर आयडी कार्ड वरील पत्ता जर आपल्याला अपडेट करायचा असेल तर सुरुवातीला www.nvsp.in या वेबसाईटवर आपल्याला भेट देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी नेशनल वोटर्स सर्विस पोर्टलचा उपयोग करा.

2) जर तुम्ही तुमचे घर बदलले आहे आणि अशा वेळी दुसऱ्या निवडणूक क्षेत्रामध्ये राहायला गेला असाल तर अशा वेळी फॉर्म नंबर 6 आपल्याला भरायचा आहे यासाठी तुम्हाला Apply online for new voter registration/due to relocation from AC” सेक्शन मध्ये जाऊन क्लिक करायचे आहे.

3) जर तुम्ही एकाच वार्ड मध्ये आहात परंतु दुसरीकडे शिफ्ट झाला असेल तर अशावेळी तुम्हाला फॉर्म नंबर 8A वर क्लिक करून तो फॉर्म भरायचा आहे. या फार्ममध्ये आवश्यक असलेली संपूर्ण माहिती न चुकता भरायला हवी

4) जसे की आपले नाव जन्म तारीख राज्य क्षेत्र विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्र तसेच सध्याचा पत्ता किंवा पर्याय म्हणून तुम्ही तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी वैयक्तिक माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायची आहे.

5) तुमचा फोटोग्राफ, पत्त्याचा पुरावा आणि वयाचा दाखला इत्यादी सगळे कागदपत्र तुम्हाला या साईटवर अपलोड करायचे आहेत सोबतच कागदपत्र अपलोड केल्यानंतर हा फॉर्म ऑनलाइन तुम्हाला सबमिट करायचा आहे, एवढे केल्यानंतर तुम्हाला आता एक कॅपचा नंबर येईल तो नंबर तुम्हाला व्यवस्थित पाहून टाईप करायचा आहे आणि तिथे दिलेला डिक्लेरेशन ऑप्शन व्यवस्थितरित्या भरायचा आहे. 6) तुम्ही जी काही माहिती या फॉर्ममध्ये भरलेली आहे ती माहिती व्यवस्थित रित्या तपासून पहा आणि त्यानंतरच सबमिट बटन वर क्लिक करा.

7) यासोबतच तुम्हाला एक आवेदन पत्र म्हणजेच विनंती अर्ज जमा करावे लागेल जेणेकरून तुमचे तुमचा पत्ता बदलून जाईल आणि हा पत्ता तुम्हाला ईमेल च्या माध्यमातून एक मॅसेज येईल जर आवेदनपत्रामध्ये मोबाईल नंबर दिला असेल तर दिला गेलेला मोबाईल नंबर वर सुद्धा तुम्हाला तुमचा पत्ता बदलला आहे असा एक मॅसेज सुद्धा येईल.

अशा प्रकारे कोणतीही काळजी न करता तुम्ही तुमच्या वोटर आयडी वरील घराचा पत्ता सहजरित्या बदलू शकता किंवा असलेल्या व त्यावरच काही अपडेट सुद्धा करू शकता म्हणून ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे अन्यथा तुम्हाला भविष्यात मतदान करता येणार नाही.

संबंधित बातम्या :

निवडणुक आयोगाची सभा आणि रॅलीला बंदी; पाहा काय आहे नियमावली

VIDEO: गोव्यातील उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार?; संजय राऊतांनी सांगितली तारीख

Goa Elections 20022 : उत्पल पर्रिकरांच्या तिकीटावरून रणकंदन, परीकरांना कुणाची ऑफर? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.