Sensex down : शेअर बाजारात घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 1100 अंकांनी गडगडला; निफ्टी डाउन

शेअर बाजारात आज (गुरुवार)सेन्सेक्समध्ये 1100 अंकांच्या घसरण नोंदविली गेली. निफ्टी 16 हजार अंकांच्या टप्प्यावर बंद झाला. शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे तब्बल 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Sensex down : शेअर बाजारात घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 1100 अंकांनी गडगडला; निफ्टी डाउन
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 7:14 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारातील (SHARE MARKET) घसरणीचं सत्र अद्यापही कायम आहे. जागतिक अर्थपटलावरील घडामोडींमुळे सलग 5 व्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. शेअर बाजारात आज (गुरुवार)सेन्सेक्समध्ये 1100 अंकांच्या घसरण नोंदविली गेली. निफ्टी 16 हजार अंकांच्या टप्प्यावर बंद झाला. शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे तब्बल 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात 5 मे पासून सलग घसरणीचं सत्र दिसून येत आहे. केवळ 4 एप्रिलचा अपवाद वगळता 28 एप्रिल पासून शेअर बाजारात घसरणीचं सत्र कायम आहे. आजच्या व्यवहारादरम्यान प्रमुख निर्देशांक (MAJOR INDICES) 2 टक्क्यांहून अधिक घरसणीसह बंद झाले. काल (बुधवारी) सेन्सेक्स 1158 अंकांच्या घसरणीसह 52930 अंकावर आणि निफ्टी 359 अंकांच्या घसरणीसह 15808 टप्प्यावर बंद झाला. शेअर बाजारात चौफेर विक्रीच वातावरण होतं. सर्वाधिक नुकसान सरकारी बँका (BANK SECTOR) आणि मेटल सेक्टरचं दिसून आलं.

बाजार अस्थिर, गुंतवणुकदारांत चलबिचल

शेअर बाजारातील घसरणीला एकाधिक कारणे कारणीभूत ठरली आहेत. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे महागाईचा आलेख उंचावण्याची धास्ती गुंतवणुकदारांमध्ये आहे. त्यामुळे जागतिक अर्थपटलावर घसरण नोंदविली गेली. तसेच फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढीचं संकेत दिले आहेत. परकीय गुंतवणुकदारांनी शेअर बाजारातून पैशाचा ओघ सुरुच ठेवला आहे. आगामी काळात बाजारात अस्थिरतेचं चित्र कायम राहिल्यास गुंतवणुकदारांचा बाजारातून पैशांचा ओघ वाढू शकतो.

बँकिंग ते मेटल घसरणीचं सत्र

आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीनं झाली आणि व्यवहाराच्या अखेरीपर्यंत घसरणीचं चित्र कायम राहिलं. विप्रो वगळता अन्य स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स मध्ये समाविष्ट 9 स्टॉक 3 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. इंड्सइंड बँक 5.82 टक्के, टाटा स्टील 4.13 टक्के, बजाज फायनान्स 3.76 टक्के घसरणीसह बंद झाले. बँकिंग निर्देशांकात देखील घसरण नोंदविली गेली.

हे सुद्धा वाचा

‘रेपो’चं मळभ हटेना

शेअर बाजारात चौफेर घसरण नोंदविली गेली. सरकारी बँक निर्देशांकात मोठा तोटा सहन करावा लागला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर फेररचने संबंधित केलेल्या घोषणेमुळे बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख स्टॉक्समध्ये शेअर विक्रीचे सत्र दिसून आलं. रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात 0.4 टक्के वाढीची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेची फेररचनेचा सर्वांना अनेपक्षित धक्काच होता. एप्रिल नंतर जून महिन्यात फेररचनेचा आढावा घेतला जाणार होता. मात्र, तत्पपूर्वीच रिझर्व्ह बँकेने घोषणा केली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.