Aurangabad: रात्रीतून जमीन पोखरतंय कोण? AURIC CITY परिसरात औद्योगिक भूखंडांना पाझर तलावाचे रुप

शहर परिसरातील शेंद्रा एमआयडीसी परिसरातील औद्योगिक भूखंडांवर मुरूम माफिया मोठे खड्डे करून येथील मुरूम चोरून नेत आहेत. त्यामुळे येथील भूखंडांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. औद्योगिक नगरी औरंगाबादचे हे चित्र गंभीर परिणाम करणारे ठरू शकते.

Aurangabad: रात्रीतून जमीन पोखरतंय कोण? AURIC CITY परिसरात औद्योगिक भूखंडांना पाझर तलावाचे रुप
शेंद्रा एमआयडीसी परिसरात अशा प्रकारे भूखंड पोखरले जात आहेत.


औरंगाबादः शहर परिसरातील शेंद्रा औद्योगिक(Shendra MIDC) वसाहतीत उद्योगांसाठी राखून ठेवलेल्या भूखंडांचे मुरुम माफियांनी मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरु केल्याने सध्या शेंद्र्यात खळबळ माजली आहे. या रात्रीतूनच येथील भूखंड पोखरले जातात. त्यामुळे येथील जमिनीला पाझर तलावाचे रुप आले आहे. एमआयडीसीच्या (MIDC) ताबातील हे मोकळे भूखंड उद्योजकांनी घेतले तर त्यांच्या सपाटीकरणासाठीच मोठा पैसा ओतावा लागणार आहे.

औद्योगिक वसाहतीत खड्डेच खड्डे

या वसाहत परसिरात उद्योगांच्या भूखंडावर रात्रीच्या अंधारात बेसुमार मुरूम उपसा केला जातो. त्यामुळे वसाहतीत प्रचंड खड्डे झाले आहेत. नेहमीप्रमाणे महसूल व पोलीस प्रशासनाला याची कोणतीही कल्पना नाही. एमआयडीसीने यासंबंधी एक पत्र महसूल विभागाला पाठवले. पण त्याचा उपयोग झाला नाही. सरकारी जमिनीतील मुरूम चोरी केल्याबद्दल माफियांवर गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. शेंद्रा एमआयडीसीलगत ऑरिक सिटी विकसित होत आहे. येथे देश-विदेशातील उद्योगपती येत असतात. त्यांच्या नजरेस असे भूखंड दिसल्यास उद्योगपती येथे येण्यास कसे तयार होतील, असा प्रश्न आहे.

पहाटे 3ते 4 च्या दरम्यान उत्खनन

शेंद्रा एमआयडीसी परिसरात पहाटे 3ते 4 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हे प्रकार नेमकं कोण करतंय, त्यांना कुणाचं अभय आहे, हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत.

तहसीलदार स्वतः पाहणी करणार

या प्रकरणी तहसीलदार ज्योती पवार म्हणाल्या, मुरुमाचे बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी आम्ही पथके तयार केले आहेत. प्रत्यक्षात कुणी पकडले गेल्यास कारवाई होते. परंतु आता मी स्वतः त्याठिकाणी जाऊन पाहणी करेन.

इतर बातम्या-

VIDEO | नोट एक के पिछे एक, तमाशा देख, पाईपमध्ये 13 लाखांच्या नोटा लपवल्या, लाचखोर इंजिनिअरचा जुगाड

शक्ती मिल गँगरेप प्रकरणात अंतिम निकालाकडे लक्ष, फाशीच्या शिक्षेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI