शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Oct 30, 2019 | 10:27 PM

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली (priyanka chaturvedi Threats) आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना जीवे मारण्याची धमकी
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकतंच ट्विटरवरुन या दोन्ही नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली (priyanka chaturvedi threat msg) आहे. दरम्यान शीतल म्हात्रे यांनी याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल (priyanka chaturvedi threat msg) केली आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना रात्री 9 च्या सुमारास ट्विटरवरुन धमकी देण्यात आली. आशिष केआर डेवेडी असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. @ASHISHKRDW2 या ट्विटर अकाऊंटवरुन शीतल म्हात्रे आणि प्रियांक चतुर्वेदी यांना धमकी देण्यात आली आहे.

शीतल म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4.30 च्या सुमारास त्या ट्विटर अकाऊंट तपासत असताना त्यांना ट्विटरवरुन धमकीवजा मॅसेज दिसला. त्यात शिवसेना प्रवक्त्या आणि नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही ट्विटरच्या माध्यामातून हा धमकीवजा मॅसेज देण्यात आला होता. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली.

 

शीतल म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, आशिष नावाच्या व्यक्तीने त्याच्या @ASHISHKRDW2 या ट्विटर अकाउंटवरुन यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीनंतर आरोपीवर कलम 506 अतंर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शीतल म्हात्रे गेल्या 15 वर्षांपासून बोरिवली लिंकरोड वरील कांदरपाडा परिसरात राहतात. शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्याशिवाय त्या मुंबई महानगरपालिकेच्या विधी आणि महसूल मंडळाच्या अध्यक्षाही आहेत.

कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी?

  • ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका चतुर्वेदींना काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.
  • प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जातात.
  • राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची बाजू मांडणारा महिला चेहरा म्हणून प्रियांका चतुर्वेदींची ओळख आहे.
  • त्यांनी अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे विविध चॅनेल्सवरील डिबेट शो मध्ये काँग्रेसची बाजू मांडली
  • तेहलका, डीएनए आणि फर्स्टपोस्ट यासारख्या दैनिकांमध्ये त्यांनी स्तंभ लिहिले आहेत.
  • विविध पुस्तकांवर प्रकाशझोत टाकणारा त्यांचा ब्लॉक नेटीझन्समध्ये लोकप्रिय आहे. पुस्तक समीक्षा
  • दोन एनजीओच्या माध्यमातून प्रियांका चतुर्वेदी यांनी शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्याबाबत काम केलं आहे
  • प्रियांका चतुर्वेदी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1979 रोजी मुंबईत झाला. त्यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील आहे. त्या मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचं प्राथमिक शिक्षण जुहू इथल्या सेंट जोसेफ शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण नरसी मोनजी कॉलेज विले पार्ले इथं झालं. विवाहित प्रियांका चतुर्वेदी यांना दोन मुलं आहेत.