Aditya Paudwal | ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन

गेल्या काही दिवसांपासून आदित्य पौडवाल मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

Aditya Paudwal | ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन
| Updated on: Sep 12, 2020 | 11:41 AM

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. (Singer Anuradha Paudwal‘s Son Aditya Paudwal Passes Away)

किडनी निकामी झाल्याने आदित्य पौडवालचे निधन झाल्याची माहिती आहे. आज (शनिवार 12 सप्टेंबर) पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यात अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या निधानातून बॉलिवूड आणि चाहते सावरले नसताना आणखी एक धक्का बसला आहे

दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा आदित्य हा मुलगा. आदित्यही आई-वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात कार्यरत होता.

म्युझिक अरेंजर, संगीतकार म्हणून आदित्यने संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘साहेब तू’ या गाण्याचा प्रोड्युसर म्हणूनही त्याने काम केले होते.

गेल्या काही दिवसांपासून आदित्य मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

आदित्य पौडवालच्या पश्चात आई अनुराधा पौडवाल आणि गायिका बहीण कविता पौडवाल असा परिवार आहे.

“अरुण पौडवाल आणि अनुराधा पौडवाल खूप गप्पिष्ट. पूर्वी खारच्या त्यांच्या घरी जाणे झाले की हा छोटासा आदित्य छान हसून स्वागत करणार. त्यानेही संगीत वारसा जपला…. आज वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्याच्या जाण्याचे वृत्त प्रचंड धक्कादायक. दुर्दैव” अशा शब्दात प्रख्यात सिने अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी आठवणी जागवल्या आहेत.

(Singer Anuradha Paudwal‘s Son Aditya Paudwal Passes Away)