जास्त वेळ एकाच जागी बसणाऱ्यांना ‘या’ आजारांचा धोका

| Updated on: Jun 03, 2019 | 9:42 PM

मुंबई : हल्लीच्या काळात कामाचं स्वरुप बदलतंय. कामातील ताण आणि कामाचे तासही दिवसेंदिवस वाढतात. दिवसातील आठ ते नऊ तास आपण ऑफिसमध्ये घालवतो. ऑफिसमध्ये गेल्यावर एकदा कॉम्प्युटरवर काम सुरु केलं की, तासनतास आपण जागेवरुन उठत नाही. काही जण तर ऑफिसमधून घरी गेल्यावर सुद्धा टीव्ही किंवा स्मार्टफोनवर गुंतलेले असतात. या सर्व गोष्टीमुळे आपल्या शरीराची हालचाल होत नाही. […]

जास्त वेळ एकाच जागी बसणाऱ्यांना या आजारांचा धोका
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

मुंबई : हल्लीच्या काळात कामाचं स्वरुप बदलतंय. कामातील ताण आणि कामाचे तासही दिवसेंदिवस वाढतात. दिवसातील आठ ते नऊ तास आपण ऑफिसमध्ये घालवतो. ऑफिसमध्ये गेल्यावर एकदा कॉम्प्युटरवर काम सुरु केलं की, तासनतास आपण जागेवरुन उठत नाही. काही जण तर ऑफिसमधून घरी गेल्यावर सुद्धा टीव्ही किंवा स्मार्टफोनवर गुंतलेले असतात. या सर्व गोष्टीमुळे आपल्या शरीराची हालचाल होत नाही. शरीराची हालचाल न झाल्याने अनेकांना मधुमेहासारखा गंभीर आजार होऊ शकतो. अमेरिकेतील मेयो क्लिनीकने याबाबतच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

मेयो क्लीनिकने दिलेल्या अहवालानुसार, शरीराची हालचाल न झाल्याने माणसाला गंभीर आजार होऊ शकतात. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक चालणे-फिरणे, व्यायम करणे या गोष्टींना महत्त्व देत नाहीत. मात्र यामुळे लोकांना पाठीचे, हात किंवा पायाचे, किंवा कंबरेचे आजार होऊ शकतात. विशेष म्हणजे शरीराची हालचाल न झाल्याने अनेकांना टाईप 2 डायबीटीज, हृदयासंबंधीचे रोग, कॅन्सर यांसारखे गंभीर आजारांचाही सामना करावा लागतो. तसेच दिवसभर एका जागेवर बसल्याने लोकांना स्मृतीभंशासारखे घातक आजारही होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

याबाबत मैकमास्टर युनिव्हर्सिटीने दिलेल्या अहवालानुसार, दोन आठवडे  किमान 1 हजार पावलांपेक्षा कमी चालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे या व्यक्तींना मधुमेहासारखा गंभीर आजाराचा सामना करावा लागतो.

स्मृतीभंशाचा धोका

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने ऑगस्ट 2018 ला केलेल्या एका अहवालानुसार, दररोज 10 ते 15 तास शरीराची कोणतीही हालचाल न करणाऱ्या लोकांना कोणत्याही गोष्टी लक्षात राहत नाही. या लोकांमध्ये नवीन कोणतीही गोष्ट शिकण्याचा उत्साहही नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

तासनतास ऑफिसमध्ये बसण्याची सवय मोडण्यासाठी हे करा

  • तहान लागल्यानंतर बॉटलमधून पाणी पिण्यापेक्षा जागेवरुन उठून पाणी पिण्यास जा
  • दर अर्धा तासांनी जागेवर उभे राहून बॉडी स्ट्रेच करावी
  • ऑफिसमध्ये एखाद्या मित्राकडे काम असल्यास, त्याला फोनवरुन संपर्क साधण्यापेक्षा त्याच्या जागेवर जाऊन ते काम सांगा
  • एका जागेवर बसून जेवण्यापेक्षा डबा घेऊन कॅटीनमध्ये जा
  • ऑफिसमध्ये जाताना लिफ्टचा वापर टाळा, त्याऐवजी जिन्यांचा वापर करा
  • ऑफिसमध्ये ब्रेकदरम्यान फिरताना फोनवर बोला