Solapur च्या भोयरे गावात दगडफेक करत धुळवड, Holi साजरी करण्याची अनोखी परंपरा
साधारणपणे राज्यात धुळवड ही विविध पद्धतीने साजरी केली जाते. मात्र सोलापुर (solapur) जिल्ह्यातील मोहोळ (mohol) तालुक्यातील भोयरे (bhoyare) गावात चक्क रक्तांची धुळवड खेळली जाते.
सोलापूर – साधारणपणे राज्यात धुळवड ही विविध पद्धतीने साजरी केली जाते. मात्र सोलापुर (solapur) जिल्ह्यातील मोहोळ (mohol) तालुक्यातील भोयरे (bhoyare) गावात चक्क रक्तांची धुळवड खेळली जाते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना ? पण हे खरं आहे. मोहोळ मधील भोयरे गावात दोन गटामध्ये एकमेकांवर दगडफेक करत धुळवड खेळण्याची जुनी परंपरा आहे. गावातील एक गट भवानी देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवडीला दिवसभर येथील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. यामध्ये अनेक तरुण जखमी देखील होतात. मात्र हे जखमी लोक दवाखान्यात किंवा डॉक्टरकडे न जाता देवीच्या अंगाऱ्यावर नीट होतात. जेवढे जास्त लोक जखमी होतील त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
