ST WORKER STRIKE : ST कर्मचाऱ्यांचा आजचा मुक्कामही आझाद मैदानातच, संपाबाबत उद्या 11 वाजता निर्णय-खोत

| Updated on: Nov 24, 2021 | 8:08 PM

ऐतिहासिक पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांची आजची रात्रही आझाद मैदानात जाणार आहे. संपाबाबत उद्या निर्णय घेऊ अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

ST WORKER STRIKE : ST कर्मचाऱ्यांचा आजचा मुक्कामही आझाद मैदानातच, संपाबाबत उद्या 11 वाजता निर्णय-खोत
sadabhau-khot
Follow us on

मुंबई : ऐतिहासिक पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांची आजची रात्रही आझाद मैदानात जाणार आहे. संपाबाबत उद्या सकाळी 11 वाजता निर्णय घेऊ अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. मोठ्या घोषणेनंतरही संपाबाबत अजूनही तोडगा निघाला नाही. मुंबई, पुणे, नाशिकसह काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.

विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम

ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर आजही तोडगा निघाला नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा केलीय. कर्मचाऱ्यांसाठी इन्सेटिव्ह योजना आणणार असल्याचं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत देण्याबाबत खबरदारी घेणार आसल्याचंही अनिल परबांकडून सांगण्यात आलं.

दिवसभराच्या बैठकानंतरही रात्र थंडीतच

गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा मुक्काम आझाद मैदानात आहे. त्यावर आजही तोडगा न निघाल्यानं कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आजची रात्रही थंडीत जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं, त्यानंतर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं. त्यानंतर पडळकर आणि खोत आझाद मैदानात पोहोचले, मात्र तोपर्यंत अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. त्यामुळे संपाबाबत उद्या निर्णय घेऊ अशी माहिती सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी दिली. संपावर आजही तोडगा न निघाल्यामुळे सर्वसामान्यांना लालपरीचा प्रवास कधी मिळणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.