पुण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा, घरी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात

| Updated on: May 01, 2020 | 8:22 PM

लॉकडाऊनदरम्यान इतर जिल्ह्यांतून आलेले आणि पुण्यात अडकलेल्या नागरिकांना (Stranded citizens get relief) आपापल्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे.

पुण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा, घरी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात
Follow us on

पुणे : “लॉकडाऊनदरम्यान पुण्यात अडकलेल्या नागरिकांना (Stranded citizens get relief) आपापल्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात जिल्ह्याधिकारी हे नोडल ऑफिसर असणार आहेत”, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली (Stranded citizens get relief).

“नागरिक ज्या तालुक्यांमध्ये अडकले आहेत त्या तालुक्याच्या तहसीलदारांची परवानगी घेऊन त्यांना आपापल्या गावी परत जाता येणार आहे. त्यासाठी तहसील कार्यालयातून नागरिकांना पासेस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना ऑनलाईन ई मेल करुनही आपापल्या गावी जाण्याची परवानगी घेता येणार आहे”, असं डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

“या नागरिकांची गावी जाण्याअगोदर वैद्यकीय तपासणी केली जाईल. वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांना आपल्या इच्छित स्थळी जाता येणार आहे. याशिवाय घरी परतल्यावर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. सध्या बाहेरुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे”, अशी माहितीदेखील विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी

दरम्यान, “लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे”, अशी माहती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुण्यात अडकलेल्यांना गावी जाण्याची व्यवस्था होणार का? राजेश टोपे म्हणतात…