AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीव बजाज काँग्रेसच्या जवळचे उद्योगपती, त्यांचं मत वैज्ञानिक नाही : सुधीर मुनगंटीवार

"राजीव बजाज काँग्रेसच्या जवळचे उद्योगपती आहेत (Sudhir Mungantiwar on Rajiv Bajaj Statement). त्यांनी मांडलेलं मत वैज्ञानिक नाही", असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

राजीव बजाज काँग्रेसच्या जवळचे उद्योगपती, त्यांचं मत वैज्ञानिक नाही : सुधीर मुनगंटीवार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 05, 2020 | 8:45 PM
Share

चंद्रपूर : “राजीव बजाज काँग्रेसच्या जवळचे उद्योगपती आहेत (Sudhir Mungantiwar on Rajiv Bajaj Statement). त्यांनी मांडलेलं मत वैज्ञानिक नाही. लोकशाहीत त्यांना किंवा इतर कुणालाही मत मांडण्याचा अधिकार आहे”, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. याशिवाय “लॉकडाऊन किती उपयोगी ठरलं यावरुन देशातील उद्योगपतींमध्ये दोन गट तयार झाले आहेत, असं म्हणता येणार नाही”, असंही मत त्यांनी मांडलं (Sudhir Mungantiwar on Rajiv Bajaj Statement).

प्रसिद्ध उद्योगपती राजीव बजाज यांनी काल (4 मे) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत आर्थिक स्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारताने अत्यंत कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली, यामुळे कोरोना तर आटोक्यात आला नाहीच, पण अर्थव्यवस्थादेखील कोलमडल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या याच भूमिकेवर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका

“राज्य कर्मचार्‍यांचे पगार घेण्यासाठी कर्ज काढावे लागणार असल्याची वार्ता आश्चर्यजनक आहे. यामागचं कारणही कळत नाही. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. राज्याने आपल्या कर्जाचे नियमित हप्ते दिले असून गेल्या दोन-तीन महिन्यातच ही स्थिती नाजूक झाल्याचे चित्र रंगवणे योग्य नाही”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“राज्यात विविध विभागांकडे एक लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांच्या व्याजावरच राज्याचे अनेक निर्णय धाडसाने घेतले जाऊ शकतात. याशिवाय केंद्रानेही कर्ज मर्यादा वाढवून दिली आहे. त्यातूनही आणखी कर्ज मिळते. राज्य सरकार स्वतः उदासीन वातावरण तयार करत महाराष्ट्राची छवी डागाळत आहे”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

संबंधित बातमी :

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, मात्र लोक बोलायला घाबरत आहेत : राजीव बजाज

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...