नितीन गडकरी यांना भाजपने साईडलाईन केलं; सुप्रिया सुळे यांच्या विधानाने खळबळ

| Updated on: Feb 12, 2024 | 10:44 AM

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे काल बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी कार्यकर्त्यांशी तसेच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याबद्दल हे विधान केल.

नितीन गडकरी यांना भाजपने साईडलाईन केलं; सुप्रिया सुळे यांच्या विधानाने खळबळ
Follow us on

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,पुणे | 12 फेब्रुवारी 2024 : अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या. शरद पवार गटाच्या नेत्यांनी हार न मानता पुन्हा पक्ष उभा करून लढण्याचा विश्वास दर्शवला.

दरम्यान शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे काल बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी कार्यकर्त्यांशी तसेच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याबद्दल हे विधान केलं आहे. ‘ नितीन गडकरी चांगलं काम करत आहेत. पण गडकरींना साईडलाइन केलं’ असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ माजली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

हे सुद्धा वाचा

बारामतीच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे विविध मुद्यांवर बोलल्या. ‘ नितीन गडकरी चांगल काम करतात . ते भाजपमध्ये आहेत पण आम्हाला प्रेम देतात. ते दुसऱ्या पक्षात असले तरी जे चांगलंय त्याला चांगलं म्हटलं पाहिजे’ असं त्या म्हणाल्या. एवढंच नव्हे तर ‘गडकरींना साईडलाईन केलं’ असं मोठं विधानही त्यांनी केलं. यावेळी त्या देवेंद्र फडणवीसांबद्दलही बोलल्या. जनता, देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत आहे. मला त्यांचं वाईट वाटतं बिचारे १०५ आमदार आले आणि १० मार्क असताना ५ कमी केले आणि डीसीएम ( उपमुख्यमंत्री) केलं. परत दोन डीसीएम केले अडीच मार्कवर आणलं. १० पैकी अडीच मार्क सांगा मग पास की नापास ? असा सवाल त्यांनी विचारला.

महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांना घेऊन लोकसभेची निवडणूक लढणार

बारामती दौऱ्याबद्दलही त्या बोलल्या. बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात, त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत..याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांना घेऊन लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मी कुठलीही निवडणूक सोपी समजत नाही , ती एक परीक्षा असते त्याला अभ्यास करूनच बसावं लागतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ही लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये विरोधकांचा मानसन्मान केला पाहिजे. विरोधकांना मी कधीच शत्रू समजलं नाही विरोधक हा वेगळा विचार असतो. ही एक वैचारिक लढाई आहे. ही वैयक्तिक लढाई नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं, पक्ष फोडणं हेच सरकारचं काम

बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे शेतीला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.. रूरल इंडियाचा डेटा सांगतो हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. मी गेल्या काही दिवसांपासून सरकारला विनंती करीत आहे. पेटीएम मध्ये विश्वासाच्या नात्याने पैसे ठेवत आहेत, मात्र सगळा काळा पैसा पेटीएम माध्यमातून गोळा केला जात आहे. सगळ्यात जास्त पैशाचा घोळ पेटीएम च्या माध्यमातून होत आहे, हे आरबीआयचा डेटा सांगतो..

कांद्याच्या निर्यात बंद करण्याचं कारण काय ? शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणारा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला का ? हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातले आहे. पक्ष फोडणं, घरं फोडणं एवढंच काम सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न

यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरही प्रश्न उपस्थित केला. राज्यात जर महिलांना मारहाण होत असेल, जर राज्यात वकील डॉक्टर,पत्रकार, सुरक्षित नसतील ? तर मग देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. एखाद्या पोलीस ठाण्यात एखादा आमदार त्याच्या त मित्र पक्षातील सहकार्याला गोळी घालतो आणि केवळ त्यांनी पैसे घेतले म्हणून गोळ्या घातल्या असे सांगतो. नागपू