AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Case | सीबीआय तपासणी करा, दिशासाठी सुशांतच्या मित्राची हायकोर्टात धाव!

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत एप्रिल 2020पर्यंत एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Disha Salian Case | सीबीआय तपासणी करा, दिशासाठी सुशांतच्या मित्राची हायकोर्टात धाव!
| Updated on: Oct 30, 2020 | 11:00 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले होते. सुशांतच्या अशाप्रकारे निघून जाण्याने त्याच्या कुटुंबासह चाहत्यांनादेखील धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्युप्रकरण संशयास्पद वाटल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला. सुशांतच्या आत्महत्येच्या एक आठवडा आधी त्याची माजी सहाय्यक दिशा सालियनने देखील आत्महत्या केली होती (Disha Salian Case). या दोन्ही प्रकरणात काहीना काही संबंध असल्याचा दावा केला जात आहे. आता सुशांतचा मित्र सुनील शुक्ला याने देखील दिशाचे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.(Sushant’s Friend Sunil Shukla approache Bombay HC CBI probe in Disha Salian Case)

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सुनील शुक्ला यांने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिवंगत अभिनेत्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी निर्देश देण्याची विनंती सुनील शुक्लाने केली.

दिशा आणि सुशांत यांच्या आत्महत्यांचा एकमेकांशी संबध असल्याचा दावा

दिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने या घटनेच्या एका आठवड्यानंतर, 14 जून रोजी सकाळी आत्महत्या केली. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांचाही मृत्यू ‘संशयास्पदरित्या’ झाला आहे. मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास करताना अनेक बाबींचा विचार केलेला नाही, असा दावा सुनील शुक्ला यांनी याचिकेत केला आहे.(Sushant’s Friend Sunil Shukla approache Bombay HC CBI probe in Disha Salian Case)

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत एप्रिल 2020पर्यंत एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, सुशांत प्रकरण आधीच सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. त्याप्रमाणेच दिशा प्रकरणही सीबीआयकडे देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली याचिका

दिशा आणि सुशांत यांच्या आत्महत्यांचा एकमेकांशी संबध असल्याचा दावा करत पुनीत कौर धांडा यांनी वकिल विनीत धांडा यांच्यामार्फत न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी सविस्तर चौकशी करावी, तसे निर्देश न्यायालयाने द्यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या दरम्यान दिशाची केस फाईल हरवली आहे किंवा हटविली गेली आहे, असे म्हटले गेले होते. जर कोर्टाला हे असमाधानकारक वाटले तर, हा खटला पुढील तपासासाठी सीबीआयकडे पाठविला जावा, असे अपील धांडा यांनी न्यायालयात केले होते. मात्र, सदर याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता.

(Sushant’s Friend Sunil Shukla approache Bombay HC CBI probe in Disha Salian Case)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.