पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

| Updated on: Oct 15, 2020 | 3:16 PM

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
Follow us on

मुंबई : पंढरपुरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (Take A Action Against Who Resposnsible pandharpur wall Collapsed Says DCm Ajit pawar) अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पुरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. या दुर्घटनेची दखल घेत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.

दरम्यान, पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे. मंगेश गोपाळ अभंगराव(वय 35), राधाबाई गोपाळ (वय 50), पिलू उमेश जगताप (वय 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय 70), आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

घाटाच्या भिंतीच्या आडोशाला आठ जण बसले होते. भिंत कोसळल्यानंतर सर्व जण ढिगाऱ्याखाली दबले. यामध्ये चार महिला व चार पुरुषांचा समावेश होता. सहा जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले.

राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत, असे निर्देश दिले. (Take A Action Against Who Resposnsible pandharpur wall Collapsed Says DCm Ajit pawar)

संबंधित बातमी

Pandharpur Rain | चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळली, सहा जणांचा मृत्यू, घटनास्थळी आक्रोश

 Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

TV9नं केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट, पंढरपूरमध्ये मेडिकल स्टोअरवर कारवाई