सुशांतकडून टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या खात्यात 10 कोटी, ईडीकडून कसून चौकशी

जया साहा ही सुशांतकडे वर्षभरापासून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. त्याला चित्रपट व जाहिरातीचे काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

सुशांतकडून टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या खात्यात 10 कोटी, ईडीकडून कसून चौकशी
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 7:52 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहा हिला सुशांतकडून 10 कोटी रुपये मिळाल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आले आहे. जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम घेतल्याचा दावा तिने केला असला तरी एवढी मोठी रक्कम असल्याने तपास यंत्रणा चक्रावल्या आहेत. (Talent Manager Jaya Saha quizzed by ED for getting 10 Crore from Sushant Singh Rajput)

जया साहा ही सुशांतकडे वर्षभरापासून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. त्याला चित्रपट व जाहिरातीचे काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

आधी दिशा सालियन हे काम सुशांतसाठी करत होती, तिने काम सोडल्यावर जयाने या कालावधीत सुशांतकडून 10 कोटी रुपये कमावले असल्याचे बँक अकाउंटवरुन स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी त्याबाबत विचारले असता आपण ही रक्कम जाहिरातींचे कमिशन म्हणून घेतल्याचे जयाने सांगितले.

सहसा या कामासाठी कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या 3 ते 5 टक्के रक्कम कमिशन म्हणून घेतली जाते. त्यामुळे सुशांतने गेल्या वर्षभरात किती जाहिराती केल्या, याचा सविस्तर तपशील तिच्याकडून मागवण्यात आला आहे.

सुशांतने जयाला 10 टक्के कमिशन दिले, असे गृहित धरले तरी त्यासाठी एका वर्षात सुशांतने 100 कोटीपर्यंत मानधन मिळवून देणाऱ्या जाहिराती केल्या पाहिजेत. मात्र, तितकी त्याची मिळकत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जया हिने 10 कोटी का घेतले? याबाबत चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून काल दिवसभर चौकशीसत्र सुरु आहे.

सीबीआयकडून कोणाची किती तास चौकशी?

1) सिद्धार्थ पिठानी (मित्र)- सकाळी 9 वाजता DRDO गेस्ट हाऊसवर दाखल. CBI अधिकाऱ्यांकडून जवळपास 15 तास चौकशी झाल्यानंतर रात्री बाहेर पडला.

2) नीरज सिंह (स्वयंपाकी) – सकाळी 10 वाजताच्या सुमारास DRDO गेस्ट हाऊसवर दाखल. CBI अधिकाऱ्यांकडून जवळपास 14 तास चौकशी झाल्यानंतर रात्री बाहेर.

3) केशव बचनेर (स्वयंपाकी) – सकाळी 10 वाजताच्या सुमारास DRDO गेस्ट हाऊसवर. CBI अधिकाऱ्यांकडून जवळपास 14 तास चौकशी झाल्यानंतर रात्री बाहेर पडला.

4) रजत मेवाती (सीए) – सकाळी 10 वाजता DRDO गेस्ट हाऊसवर दाखल. CBI अधिकाऱ्यांकडून सुमारे 14 तास चौकशी.

5) शोविक चक्रवर्ती (रियाचा भाऊ) – सकाळी 10 वाजता DRDO गेस्ट हाऊसवर दाखल. CBI अधिकाऱ्यांकडून सुमारे 14 तास चौकशी.

संबंधित बातम्या :

सुशांतचा केअर टेकर सीबीआयच्या रडारवर, माफीचा साक्षीदार करण्यासाठी प्रयत्न?

आधी ईडी, नंतर सीबीआय, आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री, तिन्ही तपास यंत्रणांच्या रडारवर रिया चक्रवर्ती

‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

हो, शवगृहात गेल्यावर पार्थिवाला सॉरी बोलले, पहिल्या मुलाखतीत रियाची रोखठोक भूमिका

(Talent Manager Jaya Saha quizzed by ED for getting 10 Crore from Sushant Singh Rajput)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.