Thackeray movie trailer: ठाकरे सिनेमाचे दोन्ही ट्रेलर
thackeray movie trailer मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार संवादाने हा ट्रेलर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. मुंबईतील वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी तर […]

thackeray movie trailer मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार संवादाने हा ट्रेलर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. मुंबईतील वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी तर निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये हा सिनेमा असेल.
कोण कुणाच्या भूमिकेत?
मनसेचे नेते आणि सिनेदिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.शिवसेनापक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी, मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता राव आणि जयदेव ठाकरे यांच्या भूमिकेत अब्दुल कादिर आमीन हे असणार आहेत. तसेच, लक्ष्मण सिंग राजपूत, अनुष्का जाधव, निरंजन जावीर हेही या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
संजय राऊत आणि श्रीकांत भासी यांनी सिनेमाचं लेखन केले असून, राऊत एंटरटेन्मेंट निर्माती कंपनी आहे. निर्मात्यांममध्ये व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स, श्रीकांत भासी, वर्षा राऊत, पुर्वशी राऊत आणि विधिता राऊत यांचाही समावेश आहे. व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स या सिनेमाचं वितरण करणार आहे.
Marathi Trailer VIDEO:
सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात
‘ठाकरे’ सिनेमातील दोन संवाद आणि तीन दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप असला, तरी ट्रेलर प्रदर्शित होणारच, असा दावा सिनेमाचे निर्माते आणि शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, ट्रेलरमधील आक्षेपासंदर्भात सेन्सॉर बोर्डाशी चर्चा सुरु असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली.
‘ठाकरे’ सिनेमातील नेमक्या कोणत्या दृश्यावर आणि संवादावर आक्षेप आहेत?
ठाकरे या आगामी सिनेमात बाबरी मशीद प्रकरणानंतरची दंगलीचा संदर्भ आहे. यावेळी ‘आडा गुडू’ हे शब्द वापरले आहेत. तसेच, सिनेमातील एकूण तीन दृश्य आणि काही संवादांवर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, हे दृश्य किंवा संवाद आपण सिनेमातून काढणार नाही, अशी भूमिका सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि संजय राऊत यांच्यात जुंपण्याची दाट शक्यता आहे.
संबंधित बातमी