वही आणली नाही म्हणून विद्यार्थिनीला मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

रत्नागिरी : पहिलीतल्या मुलीला शिक्षिकेकडून अमानूष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली. रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलमधील ही घटना आहे. मुलीने शाळेत इंग्रजीची नोटबुक आणली नाही म्हणून शिक्षिकेनेच मुलीला अमानूष मारहाण केली. लाकडी पट्टीने मारहाण केल्याने मुलीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. मुलीला मारहाण झाल्याने संतापलेल्या पालकांनी थेट शाळेत जाऊन शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली […]

वही आणली नाही म्हणून विद्यार्थिनीला मारहाण
Follow us on

रत्नागिरी : पहिलीतल्या मुलीला शिक्षिकेकडून अमानूष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली. रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलमधील ही घटना आहे. मुलीने शाळेत इंग्रजीची नोटबुक आणली नाही म्हणून शिक्षिकेनेच मुलीला अमानूष मारहाण केली. लाकडी पट्टीने मारहाण केल्याने मुलीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. मुलीला मारहाण झाल्याने संतापलेल्या पालकांनी थेट शाळेत जाऊन शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली आहे. यशस्वी भोसले असे या सहा वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. तर झडगे असे त्या शिक्षिकेचे नाव आहे.

यशस्वी ही खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकते. यशस्वी ही दररोज शाळेत जायच्या वेळी रडायची, कारण झगडे बाई तिला शाळेत मारायच्या. याची तक्रार तिन अनेकदा आपल्या पालकांकडे केली. तिच्या आई-वडिलांनी या संदर्भात शाळेत तक्रारही केली होती.

गुरुवारी यशस्वी शाळेत गेली, त्यानंतर इंग्रजीची नोटबुक का आणली नाही म्हणून झगडे बाईंनी यशस्वीला लाकडी स्केल पट्टीने अमानुष अशी मारहाण केली. या मारहाणीमुळे यशस्वीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. शाळेतून घरी परतल्यानंतर यशस्वी कुणाशीही काही बोलत नव्हती. त्यानंतर तिच्या आजोबांनी तिची चौकशी केली, तेव्हा त्यांना घडलेला प्रकार समजला. तिच्या पायावरचे व्रण पाहून यशस्वीच्या पालकांना धक्काच बसला. आपल्या मुलीला झालेल्या मारहाणीसंदर्भात यशस्वीच्या पालकांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.

या मारहाणीमुळे यशस्वीच्या मनात शाळेची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मुलीला एवढी जबर मारहाण करणाऱ्या या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी यशस्वीच्या वडिलांनी केली आहे.