AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होताच जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, सुनेत्रा पवारांना काय दिला सल्ला?

आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होताच जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, सुनेत्रा पवारांना काय दिला सल्ला?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 31, 2026 | 6:17 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडला. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये त्यांची गटनेता म्हणून देखील निवड करण्यात आली आहे, दरम्यान सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली  प्रतिक्रिया समोर आली आहे.  सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे.   राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही, मात्र अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे.   राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही. त्यांनी आता सर्वांना सोबत घेऊन चालावं,  आता गिधाड घिरट्या घालायला लागले आहेत, त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल, अजितदादांसोबत न दिसणारे गिधाड आता दिसू लागले आहेत,  सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या या ढेकणांवर लक्ष ठेवावे, असा सल्ला यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिला आहे. काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं असावं,  पार्थ आणि जय पवार यांना दादांनी काही सल्ला दिला असेल तर त्याचं त्यांनी पालन करावं, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं होतं, आपल्याला उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल काहीही माहिती नाही, आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा त्यांचा डावपेच असू शकतो, मी सांगू शकत नाही. सर्वांना घेऊन चालावं. गिधाडं  आता घिरट्या घालायला लागले आहेत. त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. हे ढेकण आणि गिधाडं घात करू शकतात, सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं, हे ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात, त्यावेळी कुटुंबच तुमच्या कामाला येईल, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना