
TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाण्यात शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर होतं. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो.
गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 16 मधील चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. या प्रभागामध्ये सावरकर नगर, डेवले नगर, करवालो नगर, आर. जे. ठाकूर कॉलेज परिसर, ESIS हॉस्पिटल परिसर, पाइपलाइन रोड (हॉस्पिटल जंक्शन ते प्रिया माने हाऊसपर्यंत) आणि लुईसवाडीचा काही भाग यांसारख्या प्रमुख भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 16 ची एकूण लोकसंख्या 55886 इतकी आहे. त्यापैकी 5173 एवढी अनुसूचित जातीची तर 2003 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक सोळा अ मधून शिवसेनेच्या मनिषा कांबळे विजयी झाल्या होत्या, तर प्रभाग क्रमांक 16 ब मधून शिवसेनेच्या शिल्पा वाघ या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेचे गुरमुखसिंह स्यान यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेचे माणिक पाटील हे विजयी झाले होते.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 16 (अ) | ||
| 16 (ब) | ||
| 16 (क) | ||
| 16 (ड) |
गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 17 मधील चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. या प्रभागामध्ये रामचंद्र नगर, राम मारूती नगर आणि काही प्रमाणात घोडबंदर रोड यांसारख्या प्रमुख भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 17 ची एकूण लोकसंख्या 56306 इतकी आहे. त्यापैकी 4903 एवढी अनुसूचित जातीची तर 705 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक सोळा अ मधून शिवसेनेच्या एकता भोईर विजयी झाल्या होत्या, तर प्रभाग क्रमांक 17 ब मधून शिवसेनेच्या संध्या मोरे विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेचे प्रकाश शिंदे यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेचे योगेश जानकर हे विजयी झाले होते.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 17 (अ) | ||
| 17 (ब) | ||
| 17 (क) | ||
| 17 (ड) |
गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 18 मधील चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. या प्रभागामध्ये प्रामुख्याने मजिवाडा-मानपाडा परिसरातील काही भाग येतात, ज्यात कासारवडवली, पातळिपाडा, झेनिथ हॉस्पिटलजवळचे भाग, आणि घोडबंदर रोडवरील काही भाग यांचा समावेश होते. प्रभाग क्रमांक 18 ची एकूण लोकसंख्या 53414 इतकी आहे. त्यापैकी 2173 एवढी अनुसूचित जातीची तर 567 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 18 (अ) | ||
| 18 (ब) | ||
| 18 (क) | ||
| 18 (ड) |
2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक अठरा अ मधून शिवसेनेचे दीपक वेतकर विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 18 ब मधून शिवसेनेच्या जयश्री फाटक विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्या सुखदा मोरे यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेचे राम रेपाळे हे विजयी झाले होते.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE