Ashish Roy | मालिका विश्वाला आणखी एक धक्का, छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

‘ससुराल सिमर का’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत झळकलेल्या अभिनेता आशिष रॉय (TV actor Ashiesh Roy) यांचे आज (24 नोव्हेंबर) दुःखद निधन झाले आहे.

Ashish Roy | मालिका विश्वाला आणखी एक धक्का, छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:02 PM

मुंबई : ‘ससुराल सिमर का’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत झळकलेल्या अभिनेता आशिष रॉय (TV actor Ashiesh Roy) यांचे आज (24 नोव्हेंबर) दुःखद निधन झाले आहे. मुत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिनेता आशिष रॉय, मागील काही काळापासून मुंबईच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांनी उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला (TV actor Ashiesh Roy passed away).

काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आशिष यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हा व्हिडीओ चित्रित केला होता. यात आशिष रुग्णालयीन खर्चासाठी मदत मागताना दिसले होते. यावेळी केवळ अभिनेता अनुप सोनी आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मदतीचा हात पुढे केला होता. डायलासिसनंतर त्यांची किडनी पूर्णपणे खराब झाली होती. पैसे नसल्याने त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट करण्यास नकार दिला होता.

अभिनेत्याची व्यथा

आशिष यांचे मूत्रपिंड खराब झाले होते. यामुळे त्यांचे संपूर्ण शरीर सुजले होते. ऐन लॉकडाऊनच्या काळात कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी कोणताही डॉक्टर त्यांची तपासणी करण्यास तयार नव्हता. बर्‍याच दिवसांनंतर एका डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता.

त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओत आशिष म्हणाले, ‘आज (18 मे) माझा वाढदिवस आहे आणि मी या वेदनेत अडकलो आहे. मी चालूही शकत नाही. दोन दिवसांपूर्वी मी बर्‍याच डॉक्टरांशी संपर्क साधला. पण कोणीही मदत केली नाही. बर्‍याच प्रार्थनांनंतर एका जुन्या, जवळच्या डॉक्टरांनी उपचार करण्यास सहमती दर्शविली.’ (TV actor Ashiesh Roy passed away)

‘मी रुग्णालयात पोचण्याचे किती धाडस केले. पण तेव्हा तेथे कोणीच नव्हते. 4 तास वाट बघितल्यानंतर रिसेप्शनिस्टने आत बोलावले. त्यानंतर मी डॉक्टरांची भेट घेतली. मला किडनीचा त्रास आहे. परंतु डायलिसिससाठी मला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत थांबावे लागले. जेवणसुद्धा ठीक मिळत नाही. मला खूप त्रास होतो आहे’, असे म्हणत आशिष यांनी आपली व्यथा मांडली होती.

वाईट काळात कोणीचसोबत नसते…

आशिष पुढे म्हणाला होते की, ‘वाईट काळात कोणीही सोबत नसते. या वाईट काळात माझ्याबरोबर कोणीही नाही. मी एकटाच होतो. कोलकात्यात लग्न झालेलली एक बहीण आहे. नेहमी तीच मला मदत करते. पण, लॉकडाऊनमुळे ती माझ्यापर्यंत पोहचू शकत नाही. ती कोलकात्यात अडकली आहे. गेल्या 8 महिन्यांपासून काहीच काम नाहीय. औषध-उपचारांवर तब्बल 4 लाख खर्च झाले आहेत. आता कोणाकडून मदतही मिळत नाही आणि जवळचे पैसेदेखील संपले आहेत.’

(TV actor Ashiesh Roy passed away)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.