प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशाल पंजाबीची आत्महत्या

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशाल पंजाबीची आत्महत्या

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशाल पंजाबी याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी कुशलने टोकाचा निर्णय घेतल्याने मनोरंजन विश्वावर शोककळा (TV Actor Kushal Punjabi Suicide) पसरली आहे.

वांद्र्यातील पाली हिल परिसरात असलेल्या घरात कुशलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना मृतदेहासोबत सुसाईड नोटही सापडलेली आहे. कुशलने काल (गुरुवारी) रात्री आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. कुशलच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

अभिनेता करणवीर बोहरा याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कुशल पंजाबीच्या आत्महत्येची धक्कादायक बातम शेअर केली. ‘तुझ्या मृत्यूच्या बातमीने मला धक्का बसला आहे. मला अजूनही यावर विश्वास बसत नाही. मला माहित आहे तू जिथे असशील तिथे आनंदी असशील. तू ज्या पद्धतीने आयुष्य जगायचास, त्याने मला प्रेरणा मिळाली. पण मला काय माहित?’ अशी इमोशनल पोस्ट करणवीर बोहराने लिहिली आहे. TV Actor Kushal Punjabi Suicide

‘इश्क में मरजावां’ या मालिकेत चाहत्यांना कुशलचं अखेरचं दर्शन झालं होतं. कुशलने एका युरोपियन तरुणीशी लग्न केलं होतं. त्याला एक मुलगाही आहे. त्याच्या मुलाचा जन्म 2016 मध्ये झाला होता.

कुशलने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तो अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसला होता. अंदाज, लक्ष्य, काल, धन धना धन गोल यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला होता.

सीआयडी, देखो मगर प्यार से, कसम से, राजा की आयेगी बारात, अदालत अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये कुशलने काम केलं आहे. फिअर फॅक्टर इंडिया, मिस्टर & मिस टीव्ही, पैसा भारी पडेगा, नौटिका नेव्हीगेटर्स चॅलेंज, एक से बढकर एक, जोरका झटका आणि झलक दिखला जा यासारख्या अनेक रिअॅलिटी शोंमध्ये (TV Actor Kushal Punjabi Suicide) तो दिसला होता.

कुशल पंजाबीची शेवटची इन्स्टाग्राम स्टोरी

Published On - 11:16 am, Fri, 27 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI