टीव्ही 9 चा दणका : रेशनच्या धान्यात मृत उंदीर सापडल्याचे प्रकरण, अन्न वितरण विभागाची तातडीची पावले

| Updated on: Jul 29, 2020 | 8:28 AM

नागपुरातील रेशन दुकानातील धान्यात मृत उंदीर सापडल्याचे वृत्त 'टीव्ही 9 मराठी'ने काल प्रसारित केले होते, त्याची अन्न पुरवठा विभागाने दखल घेतली

टीव्ही 9 चा दणका : रेशनच्या धान्यात मृत उंदीर सापडल्याचे प्रकरण, अन्न वितरण विभागाची तातडीची पावले
Follow us on

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये रेशनच्या धान्यात मृत उंदीर सापडल्याच्या प्रकरणाची अन्न वितरण विभागाने दखल घेतली आहे. संबंधित रेशन दुकानाला भेट देत अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ‘टीव्ही 9 मराठी’ याबाबत बातमी दाखवून प्रकरणाला वाचा फोडली होती. (TV9 Impact Action taken against Nagpur Ration Wheat Rotten Dead Rat found)

नागपुरातील रेशन दुकानात सडलेल्या गव्हाचं वाटप होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यासंबंधीचे वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने काल प्रसारित केले होते. याची तातडीने दखल घेत अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत रेशन दुकानाला भेट दिली. निकृष्ट धान्य पुरवठ्याची त्यांनी पाहणी केली. परिसरातील रेशन दुकानदारांकडून निकृष्ट धान्य पुरवठ्याची माहिती घेतली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कोरोनाच्या संकट काळात गरीब जनतेला आधार म्हणून मोफत धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र मेलेला उंदीर असलेलं धान्य, सडका गहू आणि किडे पडलेला तांदूळ रेशनच्या दुकानात मिळत असल्याच्या तक्रारी येत होत्या. सडलेले धान्य वितरीत करुन सरकार गरीबांच्या भावना आणि जीवाशी खेळत असल्याचे म्हटले जात आहे.

कोरोनाच्या संकटात हाताचं काम गेलं, अशा संकटात जगण्यासाठी दुसरा पर्याय नाही, म्हणून गोरगरीब लोक हे धान्य घेतात. मात्र जनावरंही खाऊ शकणार नाहीत, अशा धान्याचं नागपूर जिल्ह्यात रेशनच्या दुकानात वाटप केलं जात असल्याचं समोर आलं.