LIVE : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी केवळ एका क्लिकवर

LIVE : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Sep 10, 2019 | 12:53 PM

[svt-event title=”शरद पवार-सोनिया गांधी यांची विधानसभेबाबत चर्चा” date=”10/09/2019,12:52PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत बैठक, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर” date=”10/09/2019,12:47PM” class=”svt-cd-green” ] शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचा पदाचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेशाची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर” date=”10/09/2019,12:17PM” class=”svt-cd-green” ] भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट, भाजपकडून तिकिट कापल्याने नाराज [/svt-event]

[svt-event title=”जागतिक बँकेचं पथक कोल्हापुरात दाखल” date=”10/09/2019,11:45AM” class=”svt-cd-green” ] जागतिक बँकेचं पथक कोल्हापुरात दाखल, महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू [/svt-event]

[svt-event title=”विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं दबावतंत्र” date=”10/09/2019,11:07AM” class=”svt-cd-green” ] विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं दबावतंत्र, आजपासून शिवसेना भवन येथे उमेदवारांच्या मुलाखती सुरू, 288 उमेदवारांची चाचपणी करणार [/svt-event]

[svt-event title=”पालघरला सकाळी 9 वाजल्यापासून जोरदार पाऊस” date=”10/09/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] पालघरला सकाळी 9 वाजल्यापासून जोरदार पाऊस, सतत पडत असलेल्या पावसाने सखल भागात पाणी, पालघर बोईसर रोड आणि पालघर माहिम रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी, पाऊस सुरू राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”भामरागड तालुका आठव्या दिवशीही पुरातच” date=”10/09/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीत गोसेखुर्द धरणाचे 22 दरवाजे 2 मीटरने उघडले, पूर आल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद, गडचिरोली जिल्ह्याचा चंद्रपूर जिल्ह्याची संपर्क तुटला, भामरागड तालुका आठव्या दिवशीही पुरातच [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें