AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#SareeTwitter ची क्रेझ, प्रियांका गांधी, चित्रा वाघसह दिग्गजांकडून फोटो शेअर

सोशल मीडियाच्या जगात दररोज नवनवीन ट्रेंड येत असतात. यामध्ये सामान्य नागरिक ते सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच तो ट्रेंड फॉलो करतात. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर एक नवा ट्रेंड सुरु आहे. #SareeTwitter, हा ट्रेंड सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

#SareeTwitter ची क्रेझ, प्रियांका गांधी, चित्रा वाघसह दिग्गजांकडून फोटो शेअर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 17, 2019 | 12:23 PM
Share

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात दररोज नवनवीन ट्रेंड येत असतात. यामध्ये सामान्य नागरिक ते सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच तो ट्रेंड फॉलो करतात. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर एक नवा ट्रेंड सुरु आहे. #SareeTwitter, हा ट्रेंड सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये महिला त्यांच्या साडीतील फोटो ट्विटरवर शेअर करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनीही हा ट्रेंड फॉलो केला आहे. त्यांनी बुधवारी (17 जुलै) सकाळी त्यांचा साडीतील एक फोटो ट्वीट केला. हा फोटो त्यांच्या लग्नाच्या वेळेचा आहे.

प्रियांका गांधी यांनी बुधवारी सकाळी एक फोटो ट्वीट करत ’22 वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळच्या पूजेचा फोटो’, असं कॅप्शन दिलं. यासोबत त्यांनी #SareeTwitter या हॅशटॅगचाही वापर केला. 18 फेब्रुवारी 1997 रोजी व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्याशी प्रियांका गांधी यांचं लग्न झालं होतं.

प्रियंका गांधी या ट्विटरवर नेहमी सक्रिय राहातात. त्या अनेक मुद्यांवर आपली मतं मांडत असतात, तर कधी विरोधकांवर निशाणाही साधतात.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या ट्रेंडला फॉलो करत पैठणी नेसलेला फोटो शेअर केला आहे.

ट्विटरवर गेल्या दोन दिवसांपासून #SareeTwitter हा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत अनेक सिनेमा कलाकार, नेते मंडळी, महिला अधिकारी, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी साडीमध्ये त्यांचे फोटो ट्वीट केले आहेत. तर पुरुषांकडून ट्विटरवर #KurtaTwitter हा ट्रेंड फॉलो केला जात आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही त्यांच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. तसेच,  काँग्रेस नेत्या रागिनी नायक यांनीही त्यांच्या अनेक फोटो शेअर केल्या.

राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर साडीमधील फोटो शेअर केले.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनेही तिचा साडीतील एक फोटो शेअर केला आहे.

साडी ट्विटरच्या ट्रेंडनंतर मुंबई पोलिसांनी #KhakiSwag ट्रेंड सुरु केला. यामध्ये पोलीस अधिकारी त्यांच्या खाकी वर्दीतील फोटो शेअर करत आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर काही फोटो शेअर केले आहेत.

Follow Us
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान