Pune | खेडमध्ये जंगली तरसाच्या हल्ल्यात 2 जण जखमी, हल्ल्याचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद

खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेला हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. या हल्ल्यात जेष्ठ नागरिक पांडुरंग जाधव आणि राहुल गाडे हा तरुण जखमी झालाय.

खेड : पुणे जिल्ह्यातील खेडमधील खरपुडी येथे जंगली तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेला हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. या हल्ल्यात जेष्ठ नागरिक पांडुरंग जाधव आणि राहुल गाडे हा तरुण जखमी झालाय. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात याचे चित्रीकरण केले आहे. या व्हिडिओमध्ये जेष्ठ नागरीक पांडुरंग जाधव रस्त्यावरून पायी निघालेले दिसतायेत. तेव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृध्दाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात धरत जखमी केले, एक तरुण वेळीच मदतीला धावल्याने पांडुरंग जाधव सुदैवाने बचावले. तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या राहुल गाडे यांना देखील चावा घेत जखमी केले आहे. जखमींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यासोबत जंगली तरसाचा देखील हल्ला सुरू आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI