
(प्रातिनिधीक फोटो)
लखनऊ : लॉकडाऊनदरम्यान पत्नी माहेरी अडकल्यानंतर उत्तर प्रदेशच्या (UP Corona Update) बरेली जिल्ह्यातील एका व्यक्तीने चुलत बहिणीसोबत लग्न केलं. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेने ‘मेरा हक’ या सामाजिक संस्थेकडे मदत मागितली आहे. ही संस्था केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहिण फरहत नकवी यांची आहे. ज्या महिलेच्या पतीने दुसरं लग्न केलं तिचं नाव नसीम असं आहे (UP Corona Update).
नसीमचं 2013 साली नईम मंसूरी या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. या दाम्पत्याला तीन मुलं आहेत. नसीम 3 मार्च रोजी आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी माहेरी गेली होती. मात्र, याचदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे नसीमला आपल्या माहेरीच थांबावं लागलं. यादरम्यान नसीमच्या पतीने आपल्या चुलत बहिणीसोबत लग्न केलं. तो तिच्यासोबतच राहू लागला.
पतीच्या लग्नाची माहिती मिळताच नसीमला धक्काच बसला. त्यानंतर प्रचंड खटाटोप करत नसीम तिच्या सासरी पोहोचली. सासरी पोहोचल्यावर तिने क्रोध व्यक्त केला. पतीला दुसऱ्या लग्नाबाबत जाब विचारला. पतीने दोघी पत्नींना सोबत घेऊन संसार करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, नसीमने या गोष्टीला विरोध केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी तिने ‘मेरा हक’ संस्थेकडे मदत मागितली आहे.
दरम्यान याप्रकरणी लवकरच पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. नसीमला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वोत्तोपरी मदत करत आहोत, अशी प्रतिक्रिया ‘मेरा हक’ संस्थेच्या संचालिका फरहत नकवी यांनी दिली.
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या उंबरठ्यावर
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 96 हजार 169 वर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरात गेल्या 24 तासात 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 36 हजार 824 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या देशभरात 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
Breaking : देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 96,169 वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, देशभरात गेल्या 24 तासात 157 रुग्णांचा मृत्यू, देशभरात 36 हजार 824 रुग्ण बरे होऊन घरी परतले, 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/ycYJuOveX0
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
संबंधित बातम्या :
गडचिरोलीत ‘कोरोना’चा शिरकाव, मुंबई-पुण्याहून आलेल्या तिघांना लागण
औरंगाबादेतील ‘कोरोना’ग्रस्त एक हजाराच्या पार, 59 नव्या रुग्णांची वाढ, कुठे किती रुग्ण आढळले?