गडचिरोलीत ‘कोरोना’चा शिरकाव, मुंबई-पुण्याहून आलेल्या तिघांना लागण

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावात दोन, तर चामोशीमध्ये एक कोरोनाग्रस्त सापडला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसलेले नाही. (Gadchiroli Three Corona Patient found with Travel History from Mumbai Pune)

गडचिरोलीत 'कोरोना'चा शिरकाव, मुंबई-पुण्याहून आलेल्या तिघांना लागण
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 10:23 AM

गडचिरोली : ‘कोरोना’ प्रादुर्भावापासून दूर राहिलेला विदर्भातील एकमेव जिल्हा गडचिरोलीतही ‘कोरोना’चा शिरकाव झाला आहे. मुंबई आणि पुण्याहून आलेल्या तिघा जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. (Gadchiroli Three Corona Patient found with Travel History from Mumbai Pune)

एकाच वेळी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर गडचिरोली जिल्हा ग्रीनमधून ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. मुंबई-पुण्याहून आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या तिघा नागरिकांची तपासणी केल्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावात दोन, तर चामोशीमध्ये एक कोरोनाग्रस्त सापडला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसलेले नाही. संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये हलवण्यात आले आहे. रुग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशिल घेणे सुरु आहे

मुंबईहून प्रवास करताना गडचिरोली जिल्ह्यात एका ट्रकमधून त्यांनी कुरखेडापर्यंत प्रवास केला होता. या ट्रकमध्ये 30 नागरिकांनी प्रवास केला होता. त्यांचा शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे.

जिल्हयातील नागरीकांना आणि बाहेरुन आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आता गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आवाहन केले आहे. सिंगला यांनी बारा तालुक्यातील प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. गडचिरोली प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं आहे.

नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत. तर वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही रुग्ण सापडले होते. मात्र आतापर्यंत गडचिरोली जिल्हा ‘कोरोना’पासून दूरच होता.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती

▪️एकूण पॉझिटीव्ह रुग्ण- 03 ▪️संशयित रुग्ण – 364 ▪️तपासणीसाठी नमुने घेतले- 60 ▪️आतापर्यंत जिल्ह्यात आलेले प्रवासी – 46 हजार 421 ▪️घरीच क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले -34 हजार 92 ▪️घरीच क्वारंटाईन केलेले प्रवासी – 6 हजार 549

(Gadchiroli Three Corona Patient found with Travel History from Mumbai Pune)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.