
UPSC परीक्षा पास झाल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत काम करायला मिळते. ही नोकरी चांगला पगार, मानमरातब, आणि सुख सुविधांना परिपूर्ण असते. वर्षातून एकदा परदेश प्रवास करायला मिळतो. बंगला, गाडी नोकर चाकर, मुलांना केंद्रिय बोर्डाच्या शाळेत प्रवेश आदि सुखसुविधांचा रेलचेल या नोकरीत असते. अशी सरकारी नोकरी कोणाला नको असेल, म्हणून तर सिव्हील, मेकेनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतरही लोक युपीएससीची परीक्षा देऊन नशीब आजमावितात, किंवा आवडत्या शाखेत जाण्यासाठी पुन्हा पुन्हा युपीएससीची परीक्षा देत असतात. भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी युपीएससीची परीक्षा पास व्हावे लागते. ही परीक्षा द्यायची असेल तर बारावीनंतरच तयारी करावी लागते. कोणत्याही शाखेचा पदवीधर ही परीक्षा देऊ शकतो. तर या युपीएससी परीक्षेसाठी नेमकी काय तयारी करावी लागते. त्यातील कोणत्या शाखेतील अधिकाऱ्याला किती वेतन असते ते पाहूयात… युपीएससी ( UPSC ) द्वारा आयोजित विविध परीक्षा आणि पक्रियेतून आपण आयएएस ( IAS – भारतीय प्रसाकीय सेवा...