अमेरिकेतील हजारो भारतीयांना फायदा होणार, DACA योजना काय आहे?

| Updated on: Dec 06, 2020 | 7:44 PM

अमेरिकेच्या न्यायालयाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम् यांचा एक महत्त्वाचा निर्णय रद्द केला आहे.

अमेरिकेतील हजारो भारतीयांना फायदा होणार, DACA योजना काय आहे?
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यायालयाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम् यांचा एक महत्त्वाचा निर्णय रद्द केला आहे. ट्रम्प यांनी माजी अमेरिका अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळातील डीएसीए योजना रद्द केली होती. मात्र, न्यायालयाने ही योजना पुन्हा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. या योजनेनुसार अमेरिकेत राहणाऱ्या अल्पवयीन मुलांना कोणतीही कागदपत्रे नसली तरी राहण्याची मुभा होती. तसेच त्यांना कारवाईपासून संरक्षण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या योजनेसाठी नव्याने अर्ज स्वीकारण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना याचा मोठा फायदा होणार आहे (US Court ordered Donald Trump administration to reinstate DACA Know how Indians will get benefit ).

डीएसीए योजना काय आहे?

डीसीए योजना बाहेर देशातील नागरिकांना अमेरिकेत राहण्यासाठी मदत करते. या योजने अंतर्गत कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण मिळतं. त्यामुळे अशा नागरिकांवर अमेरिकेतून बाहेर काढण्याची कारवाई केली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे जे लोक अमेरिकेत अल्पवयीन वयात दाखल झाले आणि येथेच वसले त्यांना अमेरिकेत राहण्याचा कायदेशीर अधिकार या योजनेमुळे मिळाला आहे.

इतकंच नाही तर या योजनेमुळे योग्य परदेशी नागरिकांना अमेरिकेत राहण्याचा 2 वर्षांचा परवाना मिळतो. असं असलं तरी या योजनेमुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मात्र मोकळा होत नाही. अमेरिकेत या योजनेची सुरुवात 2014 मध्ये माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झाली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच त्यांनी ही योजना रद्द केली होती.

किती भारतीयांना फायदा?

डीएसीए योजनेत आतापर्यंत अनेक देशांच्या जवळपास 6 लाख 40 हजार नागरिकांची नोंदणी झाली आहे. भारताविषयी बोलायचं झालं तर साऊथ एशियन अमेरिकन लिडिंग टूगेदरने (साल्ट) 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, अमेरिकेत कमीतकमी 6 लाख 30 हजार भारतीय विना कागदपत्रे राहत आहेत. अमेरिकेत जवळपास 20 हजार भारतीय डीएसीए योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र, त्यातील केवळ 13 टक्के लोकांनाच आतापर्यंत अर्ज करुन फायदा घेता आला आहे.

हेही वाचा :

अमेरीकन नागरिकांना बळजबरीने कोरोनाची लस दिली जाणार नाही : जो बायडन

अमेरिकेत ‘हेट क्राईम’मध्ये वाढ; दशकातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद

मोठी बातमी : शेवटच्या चाचणीत फायझरची लस 95 टक्के परिणामकारक, लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता

US Court ordered Donald Trump administration to reinstate DACA Know how Indians will get benefit