AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Election 2020 : अमेरिकेत निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसेंची शक्यता, व्हाईट हाऊसचं रुपांतर तटबंदी किल्ल्यात

अमेरिकेत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर हिंसेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसभोवतीची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

US Election 2020 : अमेरिकेत निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसेंची शक्यता, व्हाईट हाऊसचं रुपांतर तटबंदी किल्ल्यात
| Updated on: Nov 04, 2020 | 12:24 AM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर हिंसेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसभोवतीची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. व्यापारी संकुलं आणि बाजार पेठांमधील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानाचं नुकसान होऊ नये म्हणून लाकडाचं आच्छादन केलं आहे. महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांना हाई अलर्टवर ठेवण्यात आलं आहे (US Election 2020 Fear of electoral violence in America white house transformed into fort).

गुप्तचर यंत्रणेने व्हाईट हाऊसला तटबंदी केलेल्या किल्ल्याचं रुप दिलं आहे. राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाभोवती चारही बाजूंनी एक तात्पुरती सुरक्षा भिंत उभी करण्यात आली आहे. तेथे जवळपास 600 नॅशनल गार्डचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

हिंसेची शक्यता वर्तवल्यानंतर न्यूयॉर्कपासून बोस्टनपर्यंत, ह्यूस्टनपासून वॉशिंग्टन आणि शिकागोपर्यंत भितीचं वातावरण पाहायला मिळालं. त्यामुळेच दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. असं असलं तरी न्यूयॉर्कचे गव्हर्नर बिल डे ब्लासियो म्हणाले, “मी पोलीस आयुक्त डेरमोट शेया यांच्याशी चर्चा केली आहे आणि हिंसा होणार असल्याची कोणतीही ठोस माहिती नाही.”

दोन्ही पक्षांचे समर्थक वॉशिंग्टनमध्ये जमा होणार, संघर्षाची शक्यता

वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेच्या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, “निवडणुकीदरम्यान हिंसा होण्याची शक्यता असल्याने दुकानदारांनी अतिरिक्त सुरक्षा घेतली आहे. याशिवाय वॉलमार्टने देखील आपल्या दुकानांमधून बंदुका आणि गोळ्या हटवल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी मंगळवारी (3 नोव्हेंबर) रात्री मतमोजणी सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टनमध्ये जमा होण्याची घोषणा केली आहे. यात “ब्लॅक लाईव्हज मॅटर”च्या आंदोलकांचाही समावेश आहे.”

पोलिसांनी मात्र 12 तासांची ड्युटी सुरु असून कुणालाही सुट्टी दिलेली नसल्याचं सांगितलं. तसेच पोलीस कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, सोमवारी (2 नोव्हेंबर) सायंकाळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं, “पेंसिल्वेनियाच्या मतमोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला आहे तो हिंसा भडकवू शकतो.” अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने पेंसिल्वेनियामध्ये निवडणुकीतील मतमोजणीसाठी मतदानाच्या दिवसापासून पुढे 3 दिवसांचा वेळ दिला आहे. ट्विटरने ट्रम्प यांचं हे ट्विट वादग्रस्त आणि दिशाभूल करणारं असल्याचं म्हटलं आहे. तसेच या ट्विटला तसं नोटिफिकेशनही जोडण्यात आलंय.

हेही वाचा :

US Election 2020 : अमेरिकेत निकालाला उशीर झाल्यास असंतोषाची शक्यता : फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग

US Election 2020: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक निर्णायक 10 मुद्दे

ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल

US Election 2020 Fear of electoral violence in America white house transformed into fort

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.