US Election 2020: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक निर्णायक 10 मुद्दे

सध्या जगाचं लक्ष अमेरिकेच्या निवडणुकीवर लागलं आहे. मात्र, ही निवडणूक नेमकी कशी होते याबाबत अनेकांना प्रश्न आहेत.

US Election 2020: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक निर्णायक 10 मुद्दे
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 1:04 AM

वॉशिंग्टन : सध्या जगाचं लक्ष अमेरिकेच्या निवडणुकीवर लागलं आहे. मात्र, ही निवडणूक नेमकी कशी होते याबाबत अनेकांना प्रश्न आहेत. अमेरिकेतील मतदान कसं होतं, कोण मतदान करतं, राष्ट्रध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या समोरासमोरील वादविवादाचं यात महत्त्व काय? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या डोक्यात असतात. त्यामुळेच अमेरिकेची निवडणूक 10 प्रमुख मुद्द्यांमध्ये समजून घेणं आवश्यक आहे (Top 10 important point of US president election process).

1. मतदान कसं होतं?

अमेरिकेत (America) होणाऱ्या निवडणुकीत होणारं मतदान भारतापेक्षा वेगळं आहे. अमेरिकेत अत्यंत वेगाने अनेक राज्यांमध्ये मतदान होते. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दिवशी ज्या दिवशी मतदान असते त्याच्या आधीपासूनच नोंदणीकृत मतदारांना मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा घोषित केलेल्या दिवसाच्या आधीच अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला असतो.

2. उमेदवारासाठी अटी

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहण्यासाठी उमेदवाराचा जन्म अमेरिकेत झालेला असावा. उमेदवाराचं वय कमीच कमी 35 वर्षे असावं. याशिवाय राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती कमीत कमी 14 वर्षांपर्यंत अमेरिकेत राहिलेली असावी.

3. किती लोक मतदान करतात?

मागील महिन्यात 28 ऑक्टोबरपर्यंत मतदानाच्या आधीच जवळपास 7.5 कोटी अमेरिकन नागरिकांना मतदान केलं आहे. अमेरिकेत एकूण 24 कोटी मतदार आहेत. 2016 च्या निवडणुकीत मतदानाच्या दिवसाच्या आधीपर्यंत ‘अर्ली वोटिंग’च्या माध्यमातून 5 कोटी लोकांनी मतदान केलं होतं. मागील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना 46.1 टक्के मतदान झालं होतं, तर हिलेरी क्लिंटन यांना 48.2 टक्के मतदान झालं होतं. स्विंग स्टेट्समध्ये अधिक मतं मिळाल्याने ट्रम्प यांचा विजय झाला होता.

4. द्विपक्षीय व्यवस्था

अमेरिकेत द्विपक्षीय निवडणूक पद्धत आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रेट्स असे हे दोन पक्ष आहेत. निवडणुकीत या दोन पक्षांमधूनच एकाच्या उमेदवाराला जनता राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडते. असं असलं तरी अमेरिकेत देखील जनता थेट राष्ट्राध्यक्षांना मतदान करत नाही. आधी जनतेतून इलेक्टर्स निवडले जातात. त्यानंतर एक निवड प्रक्रिया होऊन या इलेक्टर्सच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्षांची निवड होते.

5. इलेक्टरची निवड लोकांमधून

भारताप्रमाणेच अमेरिकेत देखील थेट राष्ट्रध्यक्षांना मतदान होत नाही. जनतेतून आधी स्थानिक इलेक्टर निवडतात. हा इलेक्टर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराचा प्रतिनिधी असतो. इलेक्टर्सच्या समुहाला इलेक्टोरल कॉलेज म्हणतात. यात वेगवेगळ्या राज्यांमधून 538 इलेक्टर्स सहभागी होतात. मतदानानंतर इलेक्टर्सचं मतदान होतं आणि त्यात राष्ट्राध्यक्षांची निवड होते. राष्ट्रपती होण्यासाठी 270 पेक्षा अधिक मतं मिळावी लागतात.

6. उमेदवाराची निवड प्राथमिक निवडणुकीतून

सर्वात महत्त्वाचं हे दोन पक्ष आपला उमेदवार कसा निवडतात. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीसाठी अनेक राज्यांमध्ये प्राथमिक फेऱ्या होतात. यात पक्षाचा कोणताही कार्यकर्ता अटी-शर्तींचं पालन करत निवडणुकीत उभा राहू शकतो. ही निवडणूक केवळ पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये घ्यायची की सर्व नागरिकांमधून याचा अधिकार राज्यांना दिलेला आहे.

7. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा वादविवाद महत्त्वाचा

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणाऱ्या वादविवादाला खूप महत्त्व आहे. प्राथमिक निवडीपासून ते अगदी राष्ट्राध्यक्ष निवडीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात हा वादविवाद होतो. याचं आयोजन अमेरिकेचे न्यूज चॅनल करतात. अमेरिकेतील नागरिक याच चर्चांवरुन कुणाला मत द्यायचं हे ठरवत असल्याचंही मानलं जातं. यात सर्वात महत्त्वाची चर्चा ही ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ असते. हा वादविवाद दोन्ही पक्षांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये होतो. याचे तीन टप्पे असतात.

8. सर्वात महत्त्वाचं राज्य कोणतं?

अमेरिकेत डेलीगेट्स संख्येवरुन 415 डेलीगेट्ससह कॅलिफोर्निया राज्य सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतर 228 डेलीगेट्ससह टेक्सस राज्य दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं राज्य आहे. तसेच 110 डेलीगेस्टसह नॉर्थ कॅरोलिना तिसऱ्या क्रमांकावर आहे. या डेलीगेट्सचं महत्त्वं केवळ प्राथमिक निवडणुकीत असते. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेलीगेट्स ऐवजी इलेक्टरचं महत्त्व अधिक असतं.

9. उमेदवारांची घोषणा पक्षांच्या राष्ट्रीय संमेलनात

प्राथमिक निवडीनंतर राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा संबंधित पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात होते. डेमॉक्रेट्सचं संमेलन जुलैमध्ये, तर रिपल्बिकनचं ऑगस्टमध्ये असतं. या घोषणेनंतर उमेदवार संपूर्ण देशात प्रचार अभियान राबवतो. पक्षाच्या घोषणेनंतर संबंधित उमेदवार आपल्या समर्थकांसमोर भाषण देत आपली उमेदवारी स्वीकार करतो. तसेच उपराष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार देखील निवडतो.

10.जानेवारीमध्ये शपथविधी

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राष्ट्राध्यक्षांना आपलं मंत्रिमंडळ निवडण्यासाठी काही वेळ दिला जातो. यानंतर जानेवारीत शपथविधी होतो. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका परेडच्या माध्यमातून व्हाईट हाऊसमध्ये येतात आणि आपल्या 4 वर्षांच्या कार्यकाळाला सुरुवात करतात.

हेही वाचा :

ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल

US Election 2020 : अमेरिकेत निकालाला उशीर झाल्यास असंतोषाची शक्यता : फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग

US Election : कमला हॅरिस यांना दुर्गा माता आणि ट्रम्प यांना महिषासुर दाखवणाऱ्या फोटोवरुन वाद

Top 10 important point of US president election process

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.