AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Election : कमला हॅरिस यांना दुर्गा माता आणि ट्रम्प यांना महिषासुर दाखवणाऱ्या फोटोवरुन वाद

एका फोटोत कमला हॅरिस यांना दुर्गा मातेच्या (Durga Maa) रूपात, बायडन यांना सिंहाच्या रूपात, तर ट्रम्प यांना महिषासुराच्या रूपात दाखवण्यात आलं आहे.

US Election : कमला हॅरिस यांना दुर्गा माता आणि ट्रम्प यांना महिषासुर दाखवणाऱ्या फोटोवरुन वाद
| Updated on: Oct 20, 2020 | 9:13 PM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेतील डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांची पुतणी मिना हॅरिसकडून नुकताच एक फोटो ट्विट करण्यात आलाय. यावरुन अमेरिकेतील हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. या फोटोत कमला हॅरिस यांना दुर्गा मातेच्या (Durga Maa) रूपात, बायडन यांना सिंहाच्या रूपात, तर ट्रम्प यांना महिषासुराच्या रूपात दाखवण्यात आलं आहे (Picture showing Kamla Harris as Durga Maa).

या फोटोवरुन अमेरिकेत चांगलाच वाद निर्माण झाला आहे. हिंदू समूहातील काही लोकांनी कमला हॅरिस यांचा अशा पद्धतीनं फोटो पोस्ट केल्याबद्दल मिना हॅरिस यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. 35 वर्षीय मिना हॅरिस व्यवसायाने वकील आहेत आणि मुलांच्या पुस्तकांचं लेखनही करतात. फोटोवरुन वाद झाल्यानंतर त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं आहे. या फोटोत कमला हॅरिस यांना दुर्गा मातेच्या रुपात दाखवून त्या महिषासुर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा विनाश करत असल्याचं दिसत आहे.

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचे सुहाग शुक्ला यांनी ट्विट करत म्हटलं आहे, ‘‘तुम्ही दुर्गा मातेचा जो फोटो शेअर केला आहे त्यात दुर्गा मातेच्या चेहऱ्यावर दुसरा चेहरा लावण्यात आला आहे. यामुळे जगभरातील हिंदू लोक नाराज आहेत.’’

यानंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने धर्माशी संबंधित फोटोंचा वापर करण्याविषयी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. हिंदू अमेरिकन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीचे ऋषी भूतडा म्हणाले, ” हा अपमानकारक फोटो मीना हॅरिस यांनी बनवलेला नाही. त्यांची तो ट्विट करण्याआधी हा फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर केला जात होता.”

बायडन यांच्या प्रचार टीमकडून संबंधित फोटो त्यांच्याकडून बनवण्यात आला नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती भूतडा यांनी दिली आहे. अमेरिकन हिंदूज अगेंस्ट डिफेमेशनचे अजय शाह यांनी हा फोटो अपमानकारक असल्याचं म्हणत हिंदू समूह नाराज असल्याचं सांगितलं.

हेही वाचा :

बायडेन यांच्या प्रचार अभियानाशी संबंधित 3 जणांना कोरोना, कमला हॅरिस ऑनलाईन प्रचार करणार

US Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

Picture showing Kamla Harris as Durga Maa

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.