ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या 18 निवडणूक सभांमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी जवळपास 30 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची खळबळजनक माहिती एका संशोधन अहवालातून समोर आली आहे.

ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 3:45 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या 18 निवडणूक सभांमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी जवळपास 30 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची खळबळजनक माहिती एका संशोधन अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे या कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी जवळपास 700 जणांचा मृत्यू झाला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही धक्कादायक बाब उघड झालीय. या अहवालानुसार ट्रम्प यांच्या जेथे जेथे रॅली झाल्या तेथे तेथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आणि यात अनेकांचा जीव गेल्याने याची मोठी किंमत मोजावी लागली, असंही या अहवालात म्हटलं आहे (Study on Corona infection in Donald Trump rallies).

‘द इफेक्ट ऑफ लार्ज ग्रुप मीटिंग्स ऑन द स्प्रेड ऑफ COVID-19: द केस ऑफ ट्रम्प रॅलीज’ असं या संशोधन अहवालाचं नाव आहे. संशोधकांनी 20 जून ते 22 सप्टेंबरदरम्यान ट्रम्प यांनी घेतलेल्या 18 सभांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. या सभांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी जवळपास 30,000 जणांना कोरोनाची लागण झाल्याचंही सांगण्यात येत आहे. तसेच 700 जणांचा बळी गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

संशोधकांनी म्हटलं आहे, “आमचा अभ्यास आणि विश्लेषण मोठे कार्यक्रम किंवा सभेत COVID-19 च्या संसर्गाच्या धोक्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याला दुजोरा देणारा आहे. आम्ही आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शन सूचनांना पाठिंबा देतो. सध्या सभांमध्ये शारीरिक अंतराकडे दुर्लक्ष होत आहे आणि मास्कचा देखील कमी वापर होत आहे. त्यामुळेच कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. तसेच यात अनेक अमेरिकन नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे.”

‘डोनाल्ड ट्रम्प यांना तुमची काळजी नाही’

अमेरिकेतील डेमॉक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन यांनी हा संशोधन अहवाल ट्विटरवर पोस्ट केला आहे. ते म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तुमची काळजी नाही. ते आपल्या समर्थकांची देखील काळजी करत नाहीत. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) या संशोधन अहवालात 8.7 मिलियन लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचा उल्लेख आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात जवळपास 2 लाख 25 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

ट्रम्प यांच्या सभेत मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष

अमेरिकेतील साथीरोग नियंत्रण केंद्राने (सीडीसी) याआधीच इशारा दिला होता की मोठ्या कार्यक्रमांमध्ये शारीरिक अंतर न ठेवल्यास आणि मास्कचा वापर न केल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. सीडीसीच्या या इशाऱ्यावर प्रकाश टाकण्यासाठीच आपण हे संशोधन केल्याचं मत अहवालकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :

US Election 2020 : अमेरिकेत निकालाला उशीर झाल्यास असंतोषाची शक्यता : फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग

US Election : कमला हॅरिस यांना दुर्गा माता आणि ट्रम्प यांना महिषासुर दाखवणाऱ्या फोटोवरुन वाद

US Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून?

Donald Trump rallies may have led to over 30 thousand Corona cases and 700 death says study

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.