Donald Trump | मी जिंकलो, माझाच विजय, डोनाल्ड ट्रम्प यांचा हार मानण्यास नकार

Akshay Adhav

|

Updated on: Nov 16, 2020 | 12:18 PM

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे उमेदवार तसंच सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव झाल्याचं मान्य करत नाहीत.

Donald Trump | मी जिंकलो, माझाच विजय, डोनाल्ड ट्रम्प यांचा हार मानण्यास नकार
आम्ही योग्य स्थितीत आहोत. निवडणुकीत विजय मिळवणार असल्याचा विश्वास जो बायडन यांनी व्यक्त केला. तर अमेरिकेच्या जनतेचा कौल स्पष्ट आहे विजयी आम्हीच होणार, असा दावा ट्रम्प यांनी केलाय.
Follow us

वॉशिंग्टन: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Usa Presidential election) रिपब्लिक पक्षाचे उमेदवार तसंच सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आपला पराभव झाल्याचं मान्य करत नाहीत. आज नवं ट्विट करत आपण जिंकलोय, माझाच विजय झाल्याचा नारा त्यांनी दिलाय. याअगोदर आपण हरलो असल्याचं कबूल करताना जो बायडन यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. मात्र आज नवं ट्विट करत आपण जिंकलो असल्याचं त्यांनी म्हटलंय. (Usa Presidential election donald trump new tweet)

अमेरिकन राष्ट्राध्यपदाचा अंतिम निकाल आणखी आलेला नाही. परंतु डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन यांच्याकडे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष म्हणून पाहिले जात आहे. जो बायडन यांना 306 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. मतमोजणी अजूनही सुरुच आहे. याचदरम्यान आपण अध्यक्षीय निवडणूक जिंकली आहे, असं ट्विट ट्रम्प यांनी केलंय.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव झाल्याचं मान्य केले होते. परंतु पराभव मान्य करताना त्यांनी बायडन यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. विरोधी पक्षाने निवडणुकीत गोंधळ निर्माण केल्याचा सनसनाटी आरोप ट्रम्प यांनी केला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून आपणच विजयी झाल्याचा दावा ट्रम्प करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हार मानण्यास ट्रम्प तयार नाहीत. 538 इलेक्टोरल मतांपैकी जो बायडन यांना 306 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अमेरिकेतील अनेक राज्यांतील निकालानुसार जगभरातील माध्यमांनी बायडन याच्या वियजावर शिक्कामोर्तब केलं आहे.

दुसरीकडे, “अमेरिकेसारख्या महासत्ताधीश देशाचं नेतृत्व करण्याची अमेरिकेच्या जनतेने मला संधी दिली. अमेरिकन जनतेने केलेला हा माझा सन्मान आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तुमचा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन”, असं ट्विट करत निकालानंतर जो बायडन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या

जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!

‘जो’ जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI