AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॅलेन्टाईन विशेष : कॅन्सरग्रस्त तरुणाशी तुम्ही लग्न कराल का? रत्नागिरीच्या सोनालीच्या प्रेमाला सलाम!!

रत्नागिरी : कॅन्सर या रोगाचं नाव ऐकताच पायाखालची जमीन सरकते. पण अशा भंयकर प्रसंगात एखाद्या जोडीदाराची साथ मिळणं तेवढंच अवघड आणि कठीण सुद्धा असतं. 14 फेब्रुवारी व्हॅलेटाईन डे. पण प्रेमाचं खरा आदर्श रत्नागिरीतल्या एका जोडप्याने समाजासमोर ठेवलाय. प्रथमेशला भयंकर असा कॅन्सरच्या आजारांनी ग्रासलं. पण पेशाने नर्स असणाऱ्या सोनालीने प्रथमेशला हा आजार आहे याची माहिती असून […]

व्हॅलेन्टाईन विशेष : कॅन्सरग्रस्त तरुणाशी तुम्ही लग्न कराल का? रत्नागिरीच्या सोनालीच्या प्रेमाला सलाम!!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 14, 2020 | 1:37 PM
Share

रत्नागिरी : कॅन्सर या रोगाचं नाव ऐकताच पायाखालची जमीन सरकते. पण अशा भंयकर प्रसंगात एखाद्या जोडीदाराची साथ मिळणं तेवढंच अवघड आणि कठीण सुद्धा असतं. 14 फेब्रुवारी व्हॅलेटाईन डे. पण प्रेमाचं खरा आदर्श रत्नागिरीतल्या एका जोडप्याने समाजासमोर ठेवलाय. प्रथमेशला भयंकर असा कॅन्सरच्या आजारांनी ग्रासलं. पण पेशाने नर्स असणाऱ्या सोनालीने प्रथमेशला हा आजार आहे याची माहिती असून त्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं. या भयानक रोगावर मात करण्यासाठी सोनाली प्रथमेशच्या मागे प्रेमाची सावली (Valentines Day Cancer Patient Love Story) बनून उभी रहातेय.

14 फेब्रुवारी..व्हॅलेटाईन डे… जगभरातील प्रेमी युगुलांचा दिवस…प्रेम या शब्दाची व्याख्या सांगणारा हा दिवस. हा व्हॅलेटाईन डे जगभरात साजरा होत असताना, रत्नागिरीत एक आयडियल जोडपं आहे. प्रथमेश आणि सोनाली.

वयाच्या 20 व्या वर्षी प्रथमेशला ग्रंथींच्या कॅन्सरनी ग्रासलं. टोरोटोमा ट्युमरच्या (teratoma tumor) कॅन्सरनी प्रथमेशला हैराण केलं. रत्नागिरीतल्या हातखंबा इथल्या छोट्याशा गावात रहाणारा प्रथमेश. या आजाराची लागण झाल्याचं कळलं आणि हादरला..किमोथेरेपी घेऊन घरी परतलेल्या प्रथमेशची अवस्था त्याच्याच वाडीतील सोनालीनं पाहिली. सोनाली सुद्धा प्रथमेशच्या वयाचीच. पण एक नर्स असल्याने प्रथमेशला सोनालीनं समजून घेतलं. या रोगावर औषध उपचार सुरु असताना प्रथमेशला आधार दिला. त्याच्यासोबत उभी राहिली. टोरोटोमा ट्यूमरच्या कॅन्सरशी सामना करत असताना प्रथमेश आणि सोनाली एकमेकांना चांगले ओळखू लागले. आणि त्यामुळे सोनालीनं प्रथमेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज या दोघांच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण झाली. दोघे एकमेकांना समजून घेत सुखाने संसार करत आहेत.

प्रथमेशला त्याच्या कॅन्सरच्या उपचारासाठी आजपर्यत सात लाखांचा खर्च झाला. पण हा आजार माहित असून सुद्धा सोनालीनं प्रथमेशशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. एकाच वाडीत राहणाऱ्या प्रथमेश आणि सोनालीने साधेपणाने विवाह केला. त्याच्या आजारात प्रथमेशला जोडीदाराच्या प्रेमाची साथ हवी होती म्हणून सोनालीनं मागचा पुढचा विचार न करता प्रथमेशशी विवाह केला. सोनाली स्वतः एक नर्स आहे. त्यामुळे या आजारात काय काळजी घ्यावी लागते हे तिला माहिती होते. त्याशिवाय प्रथमेशला आजार असणाऱ्या टोरोटोमा ट्युमरच्या कॅन्सरनी वैवाहिक आयुष्यात परिणाम करणारा होता. असं असताना हा धोका ओळखून सोनालीनं प्रथमेशला साथ दिली. प्रेमानं कुठलाही आजार बरा होवू शकतो या मानसिकतेनं घरातल्यांचा विरोध झुगारुन सोनालीनं हे पाऊल उचललं.

प्रथमेश आज अकाऊंटची कामं करतोय. सोनालीसोबत तो आपलं आयुष्य जगतोय. येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रेरणा देणाऱ्या दिवसानं कॅन्सरसारखा आजारावर प्रथमेश आणि सोनाली मात करण्याचा प्रयत्न करतायत. सोनालीच्या मागे आता प्रथमेशचे नातेवाईक सुद्धा खंबीरपणे उभं राहत आहेत.

प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं सांगितलं जातं. 14 फ्रेबुवारीला अनेक प्रेमीयुगुल एकमेकांवरच्या प्रेमाच्या आणाभाका घेतील पण माणूस म्हणून सोनालीनं तिच्या मनामधील दाखवलेली आपुलकी कुठल्याही इतर प्रेमासमोर नक्कीच फिकी (Valentines Day Cancer Patient Love Story) ठरणारी असेल.

हेही वाचा : मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांकडून कबुली

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा