प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत फक्त काँग्रेसच्या पाठिशी ? नव्या पत्रात काय म्हटलं ?

| Updated on: Mar 19, 2024 | 4:02 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा दिला आहे. वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीण्यात आलं आहे. 'मविआमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागांपैकी 7 ठिकाणी आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहेत. 7 जागांची यादी द्या '

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत फक्त काँग्रेसच्या पाठिशी ? नव्या पत्रात काय म्हटलं ?
Follow us on

मुंबई | 19 मार्च 2024 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा दिला आहे. वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीण्यात आलं आहे. ‘मविआमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागांपैकी 7 ठिकाणी आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहेत. 7 जागांची यादी द्या ‘ अशा आशयाचं पत्र प्रकाश आंबेडकर यांनी खर्गेंना लिहीलं आहे.

मात्र शिवसेन ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार) या पक्षांवरील आपला विश्वास उडाला आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची सुरू असलेली बोलणी फिस्कटल्याचे दिसत आहे. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत आता फक्त काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल्याचं चित्र दिसत आहे.

काय म्हटलंय पत्रात ?

भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या सभेदरम्यान तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. मात्र त्यावेळी आपली सविस्तर चर्चा होऊ न शकल्याने मी आज हे पत्र लिहीत आगे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण न देता महाविकास आघाडीचे नेते सतत बैठका घेत आहे. काही बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) यांच्या पक्षाने नकार दिला. वंचित बहुजन आघाडीचा या दोन पक्षांवरील विश्वास उडाला आहे, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

भाजपचं सरकार घालवणं हा आमचा अजेंडा

हुकुमशाही, विभाजन करणारं आणि लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएसचं सरकार सत्तेतून घालवण्याचा आमचा मुख्य अजेंडा कायम आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रातील सात जागांवर काँग्रेसला संपूर्ण पाठिंबा देणार असल्याचं मी ठरवलं आहे. मविआच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला मिळालेल्या कोणत्याही सात जागांची यादी द्यावी, आमचा पक्ष या सात जागांवर काँग्रेसला संपूर्ण पाठिंबा देईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात लिहीलं आहे.

आता वंचितच्या या भूमिकेवर  शिवसेना ठाकरे गट आणि पवार गटाची प्रतिक्रिया काय असेल, महाविकास आघाडीवर याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.