गेमसाठी मोबाईल दिला नाही, 13 वर्षीय मुलाचा कमरपट्ट्याने गळफास

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे: गेम खेळायला मोबाईल न दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. दर्शन मनिष भुतडा असं आत्महत्या केलेल्या 13 वर्षीय मुलाचं नाव आहे.  दर्शनने सोमवारी संध्याकाळी राहत्या घरी कमरेच्या पट्टयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे कुटुंबीयांसह सर्वचजण हादरले आहेत. दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी त्याला […]

गेमसाठी मोबाईल दिला नाही, 13 वर्षीय मुलाचा कमरपट्ट्याने गळफास
Follow us

पुणे: गेम खेळायला मोबाईल न दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. दर्शन मनिष भुतडा असं आत्महत्या केलेल्या 13 वर्षीय मुलाचं नाव आहे.  दर्शनने सोमवारी संध्याकाळी राहत्या घरी कमरेच्या पट्टयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे कुटुंबीयांसह सर्वचजण हादरले आहेत.

दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी त्याला मोबाईल देणे बंद केलं होतं. मात्र ते सहन न झाल्यामुळे दर्शनने सोमवारी संध्याकाळी त्याच्या राहत्या घरी  कमरेच्या पट्टयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद धनकवडी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.

सध्या अनेक मुलं मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. मुलांना लहानपणापासूनच मोबाईल सहजासहजी मिळतो. अगदी वर्षा-दोन वर्षांच्या बाळांनाही आपणच मोबाईलची ओळख करुन देतो. मुलं मोबाईल ऑपरेट करताना पाहून पालकांना आनंद वाटतो. मात्र पुढे याच मुलांना मोबाईलचं एकप्रकारे व्यसन लागतं. जेवण-खाणं सोडून मुलं मोबाईलमध्येच गुंग असतात. त्यांना जेवण भरवण्यासाठीही मोबाईलचा वापर केला जातो. असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार दर्शन भुतडाबाबत झाल्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI