VIDEO : प्रियांका-निकचे रोमॅंटिक गाणंं सोशल मीडियावर व्हायरल

जोधपूर: देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा लग्नसोहळा आज जोधपूरमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. दरम्यान नुकतेच लग्न झाल्यावर प्रियांका आणि निकचा एक रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे. लग्न लागताच हा व्हिडीओ वोग मासिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला.   View this post on […]

VIDEO : प्रियांका-निकचे रोमॅंटिक गाणंं सोशल मीडियावर व्हायरल
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

जोधपूर: देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा लग्नसोहळा आज जोधपूरमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. दरम्यान नुकतेच लग्न झाल्यावर प्रियांका आणि निकचा एक रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे. लग्न लागताच हा व्हिडीओ वोग मासिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला.


व्हिडीओमध्ये निक जोनास आपले हीट गाणं CLOSER गाताना दिसत आहे, तर त्याच गाण्यावर प्रियांकानाचत आहे. वोग मासिकाने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलंय की, या हीट गाण्याच्या प्रदर्शनानंतर दोन वर्षांनी निक जोनास हे गाणं खास आपल्या पत्नीसाठी गात आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमान्स दिसत असल्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.

प्रियांका आणि निकचा विवाह मोठ्या जल्लोषात पार पडला आहे. लग्न लागताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

प्रियांका आणि निकने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे, तर रविवारी हिंदू विवाह पद्धतीनुसार लग्न सोहळा पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. प्रियांकाचे लग्नातील कपडे अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केले आहेत.

प्रियांका-निकच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शूटिगंचे पूर्ण काम विराट आणि रणवीरच्या लग्नात ज्या कंपनीने केले होते, त्याच कंपनीला दिले असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच लग्नानंतर दोन रिसेप्शन पार्टी असणार आहेत. एक 4 डिसेंबरला दिल्ली आणि दुसरं मुंबईमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांसाठी असणार आहे.

Follow Us