AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete | विनायक मेटेंच्या ड्रायव्हरकडून समाधानकारक उत्तरं नाहीत, फोन रेकॉर्ड तपासणार, सूत्रांची माहिती

मराठा आरक्षण लढ्याचे अग्रेसर नेते आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनानंतर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली.

Vinayak Mete | विनायक मेटेंच्या ड्रायव्हरकडून समाधानकारक उत्तरं नाहीत, फोन रेकॉर्ड तपासणार, सूत्रांची माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 11:11 AM
Share

मुंबईः शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करताना काही संशयास्पद गोष्टी आहेत का, याची खातरजमा पोलिसांकडून (Raigad Police) केली जात आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेकांनी सवाल उपस्थित केले गेले. त्यानंतर पोलिसांकडून मेटे यांच्या कारच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले होते. रायगड पोलिसांनी ड्रायव्हर एकनाथ कदम (Eknath Kadam) याची चौकशी केली. मात्र यात त्याने समाधानकारक उत्तरे दिले नसल्याचे आढळून आले आहे. टीव्ही9 च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता विनायक मेटेंचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड या दोघांचेही फोन रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. ज्या आयशरने मेटेंच्या गाडीला धडक दिली, त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही ड्रायव्हरची समोरासमोर बसवून चौकशी केली जात आहे. 14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे हे बीडकडून मुंबईकडे जात असताना पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

समाधानकारक उत्तरं नाहीत?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या ड्रायव्हरनी पोलिसांच्या तपासाला समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहेत. प्रवासादरम्यान, ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि विनायक मेटे यांना कुणाचे फोन आले होते, याचाही तपास पोलीस करणार आहेत. मेटे यांच्या कॉल्सचा डाटा पोलीस तपासणार आहेत. तसेच घटनेच्या वेळी ये-जा करणाऱ्या गाड्यांचाही तपास केला जाईल, अशी माहिती हाती आली आहे.

अपघात की घातपात?

मराठा आरक्षण लढ्याचे अग्रेसर नेते आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनानंतर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली. तसेच या घटनेचा संपूर्ण तपास करण्याची मागणी केली जातेय. दरम्यान, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही या घटनेवर संशय व्यक्त केला. राज्यात नुकतीच मोठी उलथापालथ झाली असताना मेटेंसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मग अचानक त्यांना मुंबईत कुणी बोलावलं होतं? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली. तर मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनीही सवाल उपस्थित केला. मेटे यांना संध्याकाळी 4 वाजता बैठकीला बोलावले होते. मात्र अचानक वेळ बदलली आणि मेटे यांना सकाळीच बोलावण्यात आलं. कुणाच्या हट्टापायी वेळ बदलण्यात आली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी दिलीप पाटील यांनी केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.